Kapil Sharma saam Tv
मनोरंजन बातम्या

Kapil Sharma: कपिल शर्माचा 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच झाला ट्रोल; नेटकऱ्यांनी उडवली कॉमेडीचीही खिल्ली

'द कपिल शर्मा शो' या कॉमेडी टेलिव्हिजन शो ला जगतातील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये ओळखले जाते.

Chetan Bodke

Kapil Sharma: 'द कपिल शर्मा शो' या कॉमेडी टेलिव्हिजन शो ला जगतातील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये ओळखले जाते. या कार्यक्रमाचा चाहतावर्ग भारतासह जगभरात आहे. कपिल शर्माचा हा शो अनेक वर्षांपासून लोकांचे निखळ मनोरंजन करीत आहे. पण अलीकडेच एका व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर या शो ला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे, तर नेटकऱ्यांनी कपिल शर्माच्या कॉमेडीचीही खिल्ली उडवली.

अलीकडेच एका युजरने दावा केला आहे की, कपिल शर्माचे विनोद नैसर्गिक विनोद नाहीत. तो शोमध्ये जे काही बोलतो ते टेलिप्रॉम्प्टरवरुन बोलतो. याचा पुरावा म्हणून युजरने कपिल शर्माचा व्हिडिओही शेअर केला होता, ज्यानंतर त्याच्या कॉमेडीवर सर्वच स्तरातून प्रश्न उपस्थित केले जात आहे.

कपिलच्या कॉमेडीवर सर्वच स्तरातून कौतुक केले जाते. त्याची आता देशातील टॉप कॉमेडियन्समध्ये केली जाते. पण आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून कपिल शर्मावर निशाणा साधत आहेत.

नुकताच एका यूजरने सोशल मीडियावर एक व्हिडिओही शेअर केला होता, ज्यामध्ये कपिल शर्मा टेलिप्रॉम्प्टरच्या मदतीने बोलताना दिसत आहे. टेलीप्रॉम्प्टरवर लिहिलेली स्क्रिप्ट स्टेजवरील खिडकीवर रिफ्लेक्ट होत आहे. काही यूजर्स कपिल शर्माला ट्रोल करत असतानाच काही यूजर्स आणि चाहत्यांनीही कॉमेडियनला सपोर्ट केला आहे. त्याच्यावर सध्या सोशल मीडियावर बरीच सडकून टीका केली जात आहे.

'द कपिल शर्मा शो' आज लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडता आहे. बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी देखील कपिलच्या शोमध्ये त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी येतात. कपिलच्या शोमध्ये येण्यासाठी प्रत्येक कलाकार उत्सुक असतो.

कपिल शर्मा लोकांना हसवण्याचं उत्तम काम करत असल्यानं चाहते त्याचा कार्यक्रम आवर्जून पाहतातच. मग त्यासाठी तो स्वत:चे जोक्स करुदे किंवा टेलिप्रॉम्प्टरची मदत घेऊदे. चाहत्यांना या गोष्टीची परवा नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajeshwari Kharat: 'एक नंबर तुझी कंबर...' राजेश्वरीच्या साडीतील फोटोवरून नजर हटणार नाही

Plane Accident : अहमदाबादसारखी घटना, टेकऑफनंतर विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू

Satara News: सातारलं हादरलं! एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न|VIDEO

Chapri Meaning: एखाद्याला छपरी बोलण्याआधी शब्दाचा खरा अर्थ जाणून घ्या

Maharashtra Honey Trap Case : हनी ट्रॅपमध्ये अडकलेले ते ४ मंत्री , १५ आमदार कोण?

SCROLL FOR NEXT