ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल लोक छपरी हा शब्द एखाद्याला शिवीगाळ करण्यासाठी किंवा अपमानित करण्यासाठी वापरतात. परंतु या शब्दाचा खरा अर्थ तुम्हाला माहितीये का, जाणून घ्या.
तुम्हाला माहीत आहे का, छप्परबंद नावाचा एक समाज देखील आहे.
असे मानले जाते की ही लोक मुघल सैन्यासोबत आले होते आणि त्यांनी संरक्षण छावण्यांसाठी तात्पुरते छप्पर बांधले आणि नंतर पुण्यातील एका वसाहतीत स्थायिक झाले, ज्याला नंतर 'छप्परबंद लेन' असे नाव पडले.
ब्रिटीश काळात, छप्परबंद समाजाची अनेकदा खोट्या प्रकरणांमध्ये जसे की बनावट नाण्यांची तस्करी करण्याबाबत बदनामी केली जात असे यामुळे त्यांना क्रिमिनल ट्राइब एक्ट अंतर्गत 'जन्मजात गुन्हेगार' म्हणून घोषित केले जात असे.
ही लोक आता भारतातील डि नोटिफाइड ट्राइब्स अंतर्गत येतात. छप्परबंद समाजाचे लोक घरावर छप्पर बांधण्याचे काम करत असे.
छप्परबंद समाजाचे लोक घरावर गवताने छप्पर बांधण्याचे काम करतात. छप्परबंद जातीचे लोक गवत किंवा बांबूपासून छप्पर बनवण्याचे काम करत असे.
हिंदिमध्ये छापर या शब्दाचा अर्थ छप्पर आहे आणि पारसीमध्ये बंद या शब्दाचा अर्थ बांधणारा असा आहे. छप्परबंद समाजाचे लोक मुख्यतः कर्नाटकमधील धारवाड, बिजापूर, बेळगाव आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात राहतात.