Shah Rukh Khan flaunts six abs Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan: नेटकऱ्यानं शाहरुखला दिली थेट एफआयआरची धमकी , किंग खानने गुन्हा मान्य करत मागितली माफी; नेमकं काय आहे प्रकरण?

शाहरुखच्या चाहत्याने शाहरुखचे धमकीच्या स्वरुपात कौतुक केले आहे. हा अनोखा प्रकार पाहून शाहरुखनेही त्याला प्रतिक्रिया दिली.

Chetan Bodke

Shah Rukh Khan: अखेर शाहरुखच्या 'पठान'ने जगभरात बॉक्स ऑफिसवर १००० कोटींचा गल्ला जमावला आहे. अनेक चित्रपटांना मागे सारत 'पठान'ने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 'बाहुबली ' आणि 'केजीएफ २ ' ला मागे टाकत बॉक्स ऑफिसवर यशस्वी कामगिरी केली आहे. दरम्यान, शाहरुख खानला एका चाहत्याने धमकी दिली आहे. होय, चाहत्याने अभिनेत्याचे मोठे खोटे पकडल्यामुळे त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला धमकी दिली आहे. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया...

नेहमीच शाहरु खान सोशल मीडियावर सक्रिय असतो. गेल्या अनेक दिवसांपासून शाहरुख सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत #AskSRK च्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. यावेळी त्याने आपल्या चाहत्यांना सर्वच प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी शाहरुखच्या चाहत्याने शाहरुखचे धमकीच्या स्वरुपात कौतुक केले आहे. हा अनोखा प्रकार पाहून शाहरुखनेही त्याला प्रतिक्रिया दिली. चाहत्याने शाहरुखचे काही चित्रपटातील सिक्स पॅक्सचे फोटो शेअर केले आहेत. ते फोटो पाहून नक्कीच तरुणाई थक्क होतील.

ते फोटो शेअर करत नेटकरी म्हणतो, 'शाहरुख मी तुझ्याविरोधात एफआयआर दाखल करणार आहे. तु तुझं सर्वांनाच नेहमी खोटं वय सांगतो.' या पोस्टवर प्रतिक्रिया देत शाहरुख म्हणतो, 'कृपया इतकं टोकाचं पाऊल उचलू नका. ठिक आहे, मी मान्य करतो माझं वय ५७ नाही तर ३० वर्ष आहे. मला आता खरं कळलं असून मी माझ्या आगामी चित्रपटाचं नाव ' जवान' ठेवलं आहे.'

यावर नेटकऱ्यांनी शाहरुखला वकील हवा असेल तर सांग आम्ही सजेस्ट करतो, असा ही टोमणा मारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नांदगावमधून सुहास कांदे विजयी

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे तिसऱ्यांदा आमदार

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

SCROLL FOR NEXT