famous tabla and dholaki player ashok kadam from kalyan has passed away प्रदीप भणगे
मनोरंजन बातम्या

लतादीदींच्या स्वरांना तबला-ढोलकीची साथ देणारे वादक अशोक कदम काळाच्या पडद्याआड

Kalyan - Dombivali latest News: परदेशात झालेल्या लता दीदींच्या असंख्य सोहळ्यात अशोक कदम यांनी तबला वादन केले होते. संगीत हाच ध्यास आणि संगीत हाच श्वास हा मंत्र त्यांनी अखेरर्यंत जपला.

प्रदीप भणगे

कल्याण: गान कोकिळा, भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांच्यासोबत तब्बल 25 वर्षे काम करणारे कल्याणमधील सुप्रसिद्ध तबला-ढोलकी वादक अशोक कदम (Ashok Kadam) यांचे ५६ वर्षी निधन झाले. हृदय विकाराच्या धक्क्याने (Heart Attack) काल रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आदित्य - ओंकार ही दोन मुले आहेत. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रातील अनेक कलाकारांनी तसेच कल्याणकर (Kalyankar) नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे. (famous tabla and dholaki player ashok kadam from kalyan has passed away who was works with lata mangeshkar for 25 years)

हे देखील पहा -

आपल्या तबला आणि ढोलकी वादनाच्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कल्याणातील अशोक कदम यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने काल रात्री निधन झाले आहे. अशोक कदम यांनी अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने शून्यातून आपले विश्व निर्माण केले होते. मूळचे शहापूर येथील असणारे कदम कुटुंबियांमध्ये मुळातच संगीत क्षेत्राची गोडी. त्यांच्या वडीलांपासून हा कलेचा वारसा अशोक आणि त्यांचे बंधू स्व. मनोहर यांच्यामध्ये उतरला होता. स्व. मनोहर कदम हे उत्तम सनईवादक म्हणून परिचित होते. तर अशोक कदम यांनी तबला, ढोलकी, पखवाज वाजवत.

आपल्या अनन्यसाधारण कौशल्यामुळेच भारतरत्न स्व. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यासोबत अशोक कदम यांनी थोडे थोडके नव्हे तर तब्बल 25 वर्षे काम केले. देश - परदेशात झालेल्या लता दीदींच्या असंख्य सोहळ्यात अशोक कदम यांनी तबला वादन केले होते. संगीत हाच ध्यास आणि संगीत हाच श्वास हा मंत्र त्यांनी अखेरर्यंत जपला. लतादीदींच्या सुरांना आपल्या तबला आणि ढोलकी वादनाने सुरेल साथ देणारा हा तारा आता मावळाला आहे, मात्र त्याच्या बोटांमधील स्वर हे कल्याणकरांच्या स्मरणात नेहमीच राहतील.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT