Shakira Viral Video canva
मनोरंजन बातम्या

Shakira Viral Video: "त्या व्यक्तीला अटक....." शकीरासोबत घडलेल्या प्रकारामुळे चाहते संतापले

Colambian Singer Shakira Viral Video: जगप्रसिद्ध कोलंबियन गायिका शकीरासोबत घडला संतापजक प्रकार. सोशल मीडियावर व्हिडियो व्हायरल.

Saam Tv

आजकाल अनेक कलाकार त्यांच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी स्टेज शो आयोजीत करतात. मात्र, अनेकदा प्रेक्षक निराश होऊन त्यांच्यावर त्यांचे शुज किंवा चप्पल फेकून मारतात. अशा घटना अनेक कॉन्सर्टसमध्ये घडतात. मात्र एक अशीच लाजिरवाणी तितकिच संतापजनक गोष्ट घडली आहे आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. जगप्रसिद्ध कोलंबियन गायिका शकीरासोबत असेच काही घटना घडली ज्यामुळे तिला स्टेज सोडावं लागला.

गायिका शकीरा मियामीच्या नाईट क्लबमध्ये डान्स करत होती. त्यावेळी काही लोकांनी तिचा चुकिच्या पद्धतीनं व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या व्यक्तीला काढलेला व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितले. परंतु, सुरुवातीला त्या व्यक्तीनी नकार दिला आणि तो स्टेजवरुन निघून गेला.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा लज्ज्यास्पद कृत्य पाहून अनेक नेटकऱ्यानी संताप व्यक्त केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनेक यूजर्सने कमेंट्स लिहिले आहेत, " व्हिडिओ शूट करणाऱ्या व्याक्तिला लवकरात लवकर अटक करा." तर दुसऱ्या यजरने लिहिले की, "लोकांनी त्यांची मर्यादा ओलांडल्या नाही पाहिजेस." अनेक नेटकऱ्यांनी या घटनेमुळे नेटकऱ्यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. रंगमंचावर कलाकारांचा आदर केला पाहिजेल. कलाकार आपल्या मनोरंजनासाठी अनेक प्रयत्न करतात. प्रत्येक कलाकाराला सुरक्षित वाटणे ही आपली जबाबदारी आहे. हा व्हिडिओ अमेरिकेतील मियामी शहरातला आहे. शकिरा तिच्या 'सोलटेरा' नव्या गाण्यावर स्टेज परफॉम करत होती.

काही दिवसांपूर्वी गायक करण औजलासोबत सुद्धा अशच एक घटना घडली होती. त्याच्या लंडनमधील एका स्टेज परफॉर्मन्सदरम्यान प्रेक्षकांमधून कोणीतरी त्याच्यावर बूट फेकले होते. शकीराचे फक्त कोलंबियातच नाही तर जगभरात फॅन फॉलोअर आहेत. यामुळे गायकानी आणि अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. शकीराचे फक्त कोलंबियातच नाही तर जगभरात फॅन फॉलोअर आहेत. शकीराचे इन्स्टाग्रामवर 90.3 मिलियन म्हणजेच 9 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या स्टेज परफॉमेन्स दरम्यान चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपुरमध्ये पुस्तकांचा महाकुंभ, मोबाईलला सुट्टी; 'सकाळ'च्या स्टॉलवर वाचकांची गर्दी|VIDEO

मोबाईलमधील गाणे बिबट्याला पळवतील दूर, अचानक आला समोर तर काय कराल? वनविभागाच्या महत्त्वाच्या सूचना

Salman Khan: सलमान भाईजानचा जलवा कायम; सिनेमा रिलीज होण्याआधीच केला 300 कोटीपेक्षा जास्त गल्ला

India Tourism : हिरवगार जंगल, धबधबे, व्हॅलीचे सौंदर्य; सर्वकाही एकाच ठिकाणी, 'हे' आहे स्वर्गाहून सुंदर ठिकाण

Birth Certificate: बोगस जन्म-मृत्यू दाखले रद्द होणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT