Liam Payne  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Liam Payne Death: प्रसिद्ध गायक लियाम याचं ३१ व्या वर्षी निधन, हॉटेलच्या तिसर्‍या मजल्यावरून पडून मृत्यू

Liam Payne Death :लियाम पायनेनं वयाच्या ३१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.

Manasvi Choudhary

प्रसिद्ध पॉप बँड वन डायरेक्शनचा माजी सदस्य गायक लियाम पायनेने आत्महत्या केली आहे. तिसऱ्या मजल्यावरून पडून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. लियाम पायनेच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांचा तपास सुरू आहे.

लियाम पायनेनं वयाच्या ३१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्स येथील हॉटेलच्या बाहेरून लियाम याचा मृतदेह सापडला आहे. लियाम पायने तिसऱ्या मजल्यावरून पडून त्याचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जेंटिनामधील हॉटेलच्या बाहेर लियाम पायनेचा मृतदेह मिळाला. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून त्याचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. लियाम ड्रग्सच्या नशेत असताना तोल जाऊन तो इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळला. या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

कोण आहे लियाम पायने?

लियाम पायने प्रसिद्ध ब्रिटीश गायक आहे. वन डायरेक्शन पॉप बॉय बँडमुळे त्याला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली. 2010 मध्ये एक्स फॅक्टर शोमध्ये हा बँड तयार झाला होता. या बँडमध्ये लियाम पायनेसह हॅरी स्टाईल्स, झायन मलिक, नायल होरान आणि लुइस टॉमिलसन हे देखील सामील होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला मिळणार? पक्ष बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Sleeping With Earplugs: रोज रात्री इअरप्लग लावून झोपता? आजपासूनच सोडा ही सवय नाहीतर होऊ शकतात हे गंभीर आजार

भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा कुरकुरीत 'भेंडीची भजी'

Commonwealth Games 2026 : भारताच्या लेकींचा गोल्डन पंच; बॉक्सिंगमध्ये प्रीती पवार, जॅस्मिननं जिंकली सुवर्णपदके

Inflation Alert: सणासुदीपूर्वी सर्वसामान्यांना झटका! डिटर्जंटपासून पेंटपर्यंत 'या' वस्तू होणार महाग

SCROLL FOR NEXT