Chris King Dies Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chris King Dies : प्रसिद्ध रॅपरचे वयाच्या ३२ व्या वर्षी निधन, चाहत्यांवर कोसळला दु:खाचा डोंगर

Chetan Bodke

Chris King Dies

हॉलिवूड सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. कॅलिफॉर्नियाचा प्रसिद्ध रॅपर क्रिस किंगचे निधन झाले आहे. क्रिस किंगने वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. नेमके त्याचे निधन कशामुळे झाले ? अद्याप हे कारण अस्पष्ट आहे. रॅपर क्रिस किंगच्या निधनाचे वृत्त समोर येताच चाहत्यांकडून आणि अनेक सेलिब्रिटी मित्रांकडून त्याला श्रद्धांजली वाहिली जात आहे. (Hollywood)

रॅपर क्रिस किंगचा मित्र आणि रॅपर ट्रीपी रेडने सर्वात आधी त्याच्या निधनाचे वृत्त चाहत्यांना दिले आहे. ट्रीपी रेडने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत चाहत्यांना निधनाचे वृत्त दिले आहे. क्रिस किंगच्या निधनाचे वृत्त समजताच चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यासोबतच सुप्रसिद्ध रॅपर जस्टिन बिबरनेही इन्स्टा स्टोरी शेअर करत क्रिस किंगला श्रद्धांजली वाहिली. (Social Media)

Justin Bieber Post

क्रिस किंगच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही, मात्र गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. टेनेसीच्या नॅशविलेमध्ये गोळीबाराचे प्रकरण समोर आले आहे. गोळीबार झाला तेव्हा रॅपरही तिथे उपस्थित होता आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे सांगण्यात येत आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. पण ही बातमी ऐकून चाहते दु:खी झाले आहेत. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिस किंगला श्रद्धांजली वाहिली जात आहे. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT