साहित्य विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज (Painter Imroz) यांचे निधन झाले आहे. ९७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील कांदिवली येथे ते राहत होते. राहत्या घरीच वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे साहित्य विश्वात शोककळा पसरली आहे. सध्या सोशल मीडियावर अनेकांनी पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
इमरोज यांच्या निधनाची बातमी त्यांचे जवळचे मित्र अमिया कुंवर यांनी सांगितली. अमिया कुंवर यांनी सांगितले की, 'इमरोज गेल्या काही दिवसांपासून आरोग्याशीसंबंधित समस्यांमुळे त्रस्त होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला नळीद्वारे जेवण दिले जात होते. अमृताला एक दिवसही इमरोज विसरू शकला नाही. तो नेहमी 'अमृता आहे, ती इथेच आहे', असे म्हणायचा. इमरोज आज जरी हे जग सोडून गेला असला, तरी देखील तो फक्त अमृतासोबत स्वर्गात गेला आहे.'
इमरोज यांचे मूळ नाव इंद्रजित सिंग असे होते. त्यांचा जन्म १९२६ मध्ये लाहोरपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात झाला होता. इमरोज यांनी जगजीत सिंग यांच्या 'बिरहा दा सुलतान' आणि बीबी नूरनच्या 'कुली रह विचार'सह अनेक प्रसिद्ध एलपीचे पहिले पान डिझाइन केले होते. ते खूपच मोठे आणि प्रिसिद्ध चित्रकार होते.
इमरोज यांची प्रेमकहाणी खूपच प्रसिद्ध होती. प्रसिद्ध दिवंगत कवीयित्री अमृता प्रीतमसोबतच्या नात्यामुळे इमरोज हे प्रकाशझोतामध्ये आले होते. त्यांची प्रेमकहाणी खूपच चर्चेत होती. इमरोज आणि अमृता प्रीतम यांनी लग्न केले नव्हते. ते ४० वर्षे एकमेकांसोबत राहिले.
इमरोज आणि अमृता यांच्या प्रेमकहाणीची खूपच चर्चा झाली होती. या दोघांच्या वयात सात वर्षांचे अंतर होते. २००५ मध्ये अमृता यांचे निधन झाले. निधनापूर्वी अमृता यांनी इमरोजसाठी 'मैं तुझे फिर मिलूंगी' अशी कविता लिहिली होती. महत्वाचे म्हणजे इमरोज हे अेमृता यांच्या निधनानंतर कवी बनले होते. त्यांनी अमृताची प्रेमकविता पूर्ण केली होती. 'उसने जिस्म छोड़ा है, साथ नहीं', असे या कवितेचे नाव होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.