famous Musician Jordan Brunoli passes away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Musician Death: प्रसिद्ध संगीतकाराचे ३१ व्या वर्षी निधन; झोपेतच घेतला अखेरचा श्वास, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

Musician Death: बग्स रॉक बँडचा बासिस्ट जॉर्डन ब्रुनोलीचे वयाच्या ३१ व्या वर्षी निधन झाले. चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंज देणाऱ्या जॉर्डनने १८ नोव्हेंबरला अखेरचा श्वास घेतला.

Shruti Vilas Kadam

Musician Death: मनोरंजन आणि संगीतविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. 'बग्स' (Bugs) या प्रसिद्ध रॉक बँडचा बासिस्ट जॉर्डन ब्रुनोली याचे निधन झाले आहे. तो अवघ्या ३१ वर्षांचा होता. गेल्या काही काळापासून तो चौथ्या स्टेजच्या कोलोरेक्टल कर्करोगाशी झुंज देत होता. मात्र, उपचारांचा परिणाम होणे बंद झाल्याने त्याची प्रकृती खालावत गेली. अखेर १८ नोव्हेंबर २०२६ रोजी त्याने जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनामुळे संगीतविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पत्नी आणि पाळीव कुत्र्यांच्या मिठीत घेतला अखेरचा श्वास

जॉर्डनची पत्नी जॉर्ज हिने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याच्या निधनाची माहिती दिली. ब्रिस्बेन येथे १८ नोव्हेंबर रोजी जॉर्डनने घरातच शांतपणे अखेरचा श्वास घेतला. यावेळी त्याची पत्नी आणि पाळीव कुत्रे त्याच्यासोबत होते. जॉर्जने दिलेल्या माहितीनुसार, जॉर्डन झोपेत असतानाच शांतपणे या जगातून निघून गेला. आयुष्याच्या शेवटच्या दिवशी त्याला कोणत्याही वेदना होत नव्हत्या. घरीच त्याची पॅलिएटिव्ह केअर करण्यात आली होती.

चौथ्या स्टेजच्या कर्करोगाचे झाले होते निदान

गेल्या वर्षी जून महिन्यात जॉर्डनला चौथ्या स्टेजच्या कोलोरेक्टल कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर त्याच्यावर केमोथेरपीसह विविध उपचार सुरू होते. मात्र, त्याच्या शरीरातील एका विशिष्ट म्युटेशनमुळे ट्यूमर वेगाने वाढत होते. कोणत्याही उपचारांचा अपेक्षित परिणाम होत नसल्याचे त्याने स्वतः चाहत्यांना सांगितले होते. ऑगस्ट महिन्यात त्याने आपल्या प्रकृतीबाबत शेवटची महत्त्वाची माहिती दिली होती. डॉक्टरांनी त्याला केवळ तीन ते चार महिने आयुष्य उरल्याचे सांगितले होते. त्यामुळे आपण आयुष्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचे त्याने चाहत्यांना सांगितले होते.

आजारपणातच केले होते लग्न

आजाराचे निदान झाल्यानंतर काही दिवसांतच जॉर्डन आणि जॉर्ज यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने विवाह केला. सेकंड हँड दुकानातून अवघ्या ७ डॉलरचा ड्रेस खरेदी करून त्यांनी लग्न केले होते. या लग्नाचे फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते

'हेड नॉइज' ठरला शेवटचा अल्बम

जॉर्डनने 'बग्स' बँडसोबत अनेक गाण्यांवर काम केले होते. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस बँडचा चौथा स्टुडिओ अल्बम 'हेड नॉइज' (HEAD NOISE) प्रदर्शित झाला. या अल्बमच्या निर्मितीसाठी जवळपास दोन वर्षे मेहनत घेण्यात आली होती. जॉर्डनने काम केलेला हा शेवटचा अल्बम ठरला. त्याच्या निधनानंतर चाहत्यांकडून आणि संगीतप्रेमींकडून त्याला श्रद्धांजली वाहिली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Health : नारळाचं पाणीही किडनीसाठी धोक्याचं? दररोजच्या आहारातील ९ पदार्थ नकळत वाढवतायत धोका

Maharashtra News Live Update: पुण्यातील न्यायालय परिसरातील हल्ला प्रकरणात अपडेट, तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग

Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी घसरण, महिन्याभरात 22 हजार रुपयांनी स्वस्त

CJP नेत्यांच्या अडचणी वाढणार; सौरभ दास, अभिजीत दीपके, आशुतोष रांकाविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी

1 Gram Gold Chain: सुंदर अन् रोजच्या वापरासाठी परफेक्ट, पाहा १ ग्रॅम सोन्याच्या चेनचे ७ स्टायलिश ट्रेंडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT