Famous director Imtiaz Punjabi passes away Saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Director Death: प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, सिनेविश्वावर शोककळा

Famous Director Death: दिग्दर्शक इम्तियाज पंजाबी यांचे कॅन्सरने निधन झाले. ‘दुसरी माँ’सह अनेक उत्तम कामांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या दिग्दर्शकाच्या जाण्याने मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

Shruti Vilas Kadam

Famous Director Death: मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज पंजाबी यांचे निधन झाले आहे. इम्तियाज पंजाबी काही काळापासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इम्तियाज पंजाबी यांनी आज ५ मे रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने दूरचित्रवाणी आणि चित्रपट क्षेत्रातील एक हरहुन्नरी दिग्दर्शक गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या कामाची शैली आणि वेगळा दृष्टिकोन यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते.

इम्तियाज पंजाबी हे विशेषतः “दुसरी माँ” (2022) या मालिकेमुळे प्रसिद्ध झाले. याशिवाय त्यांनी “ड्यूड्स इन द 10th सेंच्युरी” (2003) आणि “एक महानायक - डॉ. बी. आर. आंबेडकर” (2019) यांसारख्या प्रसिद्ध चित्रपट आणि मालिकांसाठीही काम केले होते. त्यांच्या या विविध कामांमुळे त्यांनी मनोरंजन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.

त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या कामातून त्यांनी सामाजिक विषय हाताळत प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. इम्तियाज पंजाबी यांनी आपल्या कारकिर्दीत वेगवेगळ्या प्रकारच्या कथांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीमध्ये एक पोकळी निर्माण झाली असून, चाहत्यांकडून आणि सहकाऱ्यांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kalayn : 'कल्याणच्या रस्त्यावरून श्रीकांत शिंदेंना फिरवा'; केडीएमसी महासभेत ठाकरे गट-शिंदे गट आमने-सामने, नेमकं काय घडलं?

hingoli earthquake : हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा हादरा; दोन महिन्यात ४ वेळा भूकंप

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? काही तरी मोठं घडणार, महायुतीत गुप्त बैठका सुरु|VIDEO

पुण्यात बोगस कॉलेजचं रॅकेट, 7 वर्षांपासून बोगस कॉलेजकडून पालकांची लूट, 'साम' इन्व्हेस्टीगेशनमध्ये पर्दाफाश

सर्वसामान्यांना झटका; सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, मध्यरात्रीपासून नवीन दर होणार लागू

SCROLL FOR NEXT