famous Brazilian influencer Derleya Alves passes away  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं निधन; अवघ्या २६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Influencer Death: ब्राझिलियन इन्फ्लुएन्सर डेरलेया आल्वेसचे कॉस्मेटिक सर्जरीनंतर निधन झाले आहे. तिच्या निधनाने तिच्या चाहत्यांना आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

Shruti Vilas Kadam

Influencer Death: ब्राझीलमधील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर डेरलेया आल्वेस हिचा अवघ्या 26 व्या वर्षी कॉस्मेटिक सर्जरीनंतर झालेल्या गुंतागुंतीमुळे मृत्यू झाला आहे. द टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, कॉस्मेटिक सर्जरीनंतर तिची प्रकृती खालावली आणि अखेर 28 फेब्रुवारी रोजी तिचे निधन झाले.

डेरलेयाने अलीकडेच स्तनवृद्धी (ब्रेस्ट ऑग्मेंटेशन) सर्जरी केली होती. या सर्जरीनंतर तिला तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. वेदना असह्य झाल्यानंतर तिला तातडीने ब्राझीलमधील Marabá हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले, मात्र तिची प्रकृती अधिकच गंभीर होत गेली. डेरलेयाची बहीण जेसिका आल्वेस हिने सोशल मीडियावर पोस्ट करत बहिणीला श्रद्धांजली अर्पण केली.

हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तिच्यावर अनेक सर्जरी कराव्या लागल्या. आतड्यांमध्ये निर्माण झालेल्या समस्येवर सर्जरी करण्यात आली तसेच तीचे अंडाशय काढून टाकण्यात आले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही तिची तब्येत सुधारली नाही. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी प्राथमिक माहितीनुसार जन्मजात आतड्यांच्या विकारामुळे परिस्थिती अधिक बिघडली असावी, अशी शक्यता व्यक्त केली आहे. मात्र याबाबतचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये कळेल असे ते म्हणाले.

सोशल मीडियावर डेरलेयाचे सुमारे 27 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. ती आपल्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडी, फॅशन आणि वैयक्तिक अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत असे. तिच्या अकाली निधनामुळे तिच्या चाहत्यांना आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अजितदादाचं निवडणूक लढवत आहे, असं समजा... सुनेत्राकाकीसाठी रोहित पवारांची भावनिक पोस्ट

Gaurav More Wedding : हास्यजत्रा फेम गौरव मोरेची बायको आहे तरी कोण?

Tulsi Water For Glowing Skin: सकाळी उठल्यानंतर प्या तुळशीच्या पानांचे पाणी, चेहरा दिसेल तेजस्वी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरणार, काँग्रेसने माघारीसाठी काय अट ठेवली?

High Blood Pressure: BP च्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने वाढतील हे ४ आजार, डॉक्टरांनी दिली धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT