Kajol is now all set to make an entry in OTT Saam Tv
मनोरंजन बातम्या

'लस्ट स्टोरीज २'मध्ये होणार काजोलची एन्ट्री? म्हणाली, '२४ इंच कंबर नसतानाही...

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल आता ओटीटीमध्ये एन्ट्री करायला सज्ज आहे. ती लवकरच एका लोकप्रिय वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल (Kajol) आता ओटीटीमध्ये एन्ट्री करायला सज्ज आहे. ती लवकरच एका लोकप्रिय वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे ज्या वेब सीरिजसाठी तिला विचारण्यात आले, ती सिरीज बोल्ड सीन्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. ती वेबसीरीज म्हणजे नेटफ्लिक्सची 'लस्ट स्टोरीज'(Lust Storys). पहिला सीझन २०१८ मध्ये आला होता. माहितीनुसार, निर्मात्यांनी काजोलशी दुसऱ्या सीझन 'लस्ट स्टोरी २' साठी संपर्क साधला आहे.

'लस्ट स्टोरीज'मध्ये चार कथा होत्या, ज्यामध्ये राधिका आपटेसह भूमी पेडणेकर, नील भूपालम, मनीषा कोईराला, संजय कपूर, जयदीप अहलावत, नेहा धुपिया, विकी कौशल, कियारा अडवाणी आणि आकाश ठोसर यांसारखे कलाकार होते. या वेब सीरीजमधील बोल्ड सीनने प्रेक्षकांना हादरवून सोडले होते. माहितीनुसार, काजोल या सीरीजच्या एका कथेत बोल्ड भूमिकेत दिसणार आहे. जर ही चर्चा खरी असेल तर प्रेक्षकांना पहिल्यांदाच काजोलची बोल्ड स्टाईल पाहायला मिळणार आहे.

ओटीटीविश्वात प्रवेश करण्यापूर्वी एका मुलाखतीत काजोलने 'ओटीटी'चे महत्त्व सांगितले होते, ती म्हणाली की, '९० च्या दशकात थिएटर हे मनोरंजनाचे एकमेव माध्यम होते. ज्यामुळे चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश मिळणे खूप सोपे होते. परंतु आता काळ बदलला आहे. ओटीटीमुळे कलाकारांना त्यांची प्रतिभा आणि क्षमता दाखवण्याची एक उत्तम संधी मिळाली आहे'.

'खर तर, आता सर्व कलाकारांसाठी खूप छान संधी आहे. कारण त्यांना खूप एक्सपोजर मिळत आहे. प्रत्येकाकडे खूप काम आहे. मला हे अभिमानास्पद वाटते की, ओटीटीमुळे काही उत्तम कलाकार बॉलिवूडला मिळाले. ओटीटीकडे असे अनेक लोक आहेत, जे खरोखरच उत्तम कलाकार आहेत. ज्यांना एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि ते खरोखर किती सक्षम आहेत हे दाखवतात. त्यांची कंबर २४ इंच की कंबर ३६ इंच आहे. छाती ४६ इंच आहे किंवा नाही, याने काही फरक पडत नाही. कारण ते एक उत्तम कलाकार आहेत', असे काजोल तिच्या मुलाखतीत ओटीटी आणि ओटीटी कलाकारांविषयी म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

Neha Kakkar: 'कँडी शॉप' गाण्यातील अश्लील डान्समुळे नेहा कक्कर ट्रोल; नेटिझन्स म्हणाले, 'देशाच्या संस्कृतीला कलंकित...'

Malad Tourism: गुलाबी थंडी अगदी जवळच फिरायला जायचंय? मग मालाडमधील या जागा ठरतील बेस्ट ऑप्शन

Secret Santa Gifts : लाडक्या मित्रांसाठी 'सिक्रेट सांता' गिफ्ट्स, 500 रुपयांच्या आता युनिक भेटवस्तू

Pune News: पुण्यातील आदिवासी पाड्यात पहिल्यांदाच प्रकाश, ४० वर्षानंतर वीज पोहचली

SCROLL FOR NEXT