Famous Singer SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Singer : प्रसिद्ध गायिकेचा छळ; विरोध करणाऱ्या भावाला झाडाला बांधले अन् बेदम मारहाण

Famous Singer News : प्रसिद्ध गायिकेचा छळ करून विरोध करणाऱ्या तिच्या भावांना बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं प्रकरण जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रसिद्ध गायिकेचा छळ करण्यात आला आहे.

विरोध करणाऱ्या गायिकेच्या भावाला मारहाण करण्यात आली आहे.

पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून कारवाई सुरू आहे.

उत्तर प्रदेशातील बस्ती येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. बस्ती येथे एका भोजपुरी गायिकेचा छळ करण्यात आला. त्यानंतर विरोध करणाऱ्या भावाला मारहाण करण्यात आली आहे. भावाने विरोध केल्यामुळे त्याला झाडाला बांधून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून कारवाई सुरू आहे.

पीडित महिला आणि तिच्या कुटुंबाने पोलीस अधीक्षक (एसपी) यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कलवारी पोलीस स्टेशन हद्दीतील भाटपुरवा गावातील एका तरुणाला गुंडांनी बेदम मारहाण केली. गुंडांनी तरुणाला झाडाला बांधले त्याचे कपडे फाडले. काठ्यांनी त्याला बेदम मारहाण केली. तरुणाला इतके मारले की काठ्या देखील तुटल्या. तरुण आपला जीव वाचवून उसाच्या शेतात लपला.

पीडित श्रीचंदची बहीण सीमा ही भोजपुरी गायिका आहे. श्रीचंद म्हणाला की, "तो त्याच्या मोठ्या भावासोबत बस्तीहून घरी परतत होता. वाटेत शिवशांतने त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. श्रीचंद घरी पोहोचताच त्याने त्याच्या कुटुंबाला घडलेली घटना सांगितली. त्यांनी त्याला शिवशांतच्या कुटुंबाला ही घटना सांगण्याचा सल्ला दिला. श्रीचंद त्याच्या बहिणीसह शिवशांतच्या घरी गेला आणि त्याची तक्रार केली. आरोपीच्या कुटुंबियांनी त्यांच्या मुलाशी समजावून सांगण्याऐवजी श्रीचंदवर अत्याचार करण्यास सुरुवात केली."

आरोपीच्या कुटुंबातील सदस्यांनी श्रीचंदची बहीण सीमा हिला गाडीतून बाहेर काढले आणि तिच्यावर हल्ला केला. कारची खिडकी फोडली. श्रीचंदला काठ्या आणि रॉडने मारहाण केली. नंतर त्याचा शर्ट फाडला आणि दोरीने झाडाला बांधले. पीडित सीमा हिने सांगितले की, "जेव्हा आम्ही त्याच्या कुटुंबाकडे तक्रार करायला गेलो तेव्हा त्यांनी आमच्यावर शिवीगाळ केली. मला गाडीतून बाहेर काढले आणि मारहाण केली. त्यानंतर माझ्या दोन्ही भावांना मारहाण करण्यात आली. माझ्या भावाला झाडाला बांधले. गाडीच्या काचा फुटल्या. गाडीत ठेवलेले 42,000 हजार रुपये घेतले. तसेच गळ्यातील सोन्याची साखळी चोरली."

घडलेल्या प्रकरणात कलवारीचे सीओ प्रदीप कुमार त्रिपाठी यांनी सांगितले की, "पीडितेच्या तक्रारीवरून कलवारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. गावात पोलीसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT