Shah Rukh Khan Debut In Tollywood Films Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan: शाहरुख करणार दाक्षिणात्य चित्रपटांत पदार्पण?, खुद्द निर्मात्यांनीच दिलं स्पष्टीकरण...

लवकरच बॉलिवूडचा किंग खान दाक्षिणात्य चित्रपटांत पदार्पण करणार आहे.

Chetan Bodke

Shah Rukh Khan: शाहरुख खानचा 'पठान' 25 जानेवारीपासून चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी 'बाहुबली 2' आणि 'केजीएफ 2' सारख्या चित्रपटांनी केलेल्या कमाईला पिछाडीवर टाकत आपले स्थान निर्माण केले आहे, 'पठान'ने गेल्या आठवड्याभरात देशामध्ये 316 कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, 'केजीएफ'च्या निर्मात्यांनी एका हिंदी चित्रपटासाठी शाहरुख खानसोबत चर्चा केल्याची माहिती सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे.

'केजीएफ १' आणि 'केजीएफ २' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट निर्मित करणाऱ्या Homble Films या प्रोडक्शन हाऊसने आता शाहरुख खानसोबत हिंदी चित्रपट बनवण्यासाठी चर्चा केली आहे. चित्रपट निर्माते विजय किरगंदूर यांनी स्पष्ट केले की, सध्या अशी कोणतीही योजना नाही. हिंदी चित्रपटासाठी आपण शाहरुख खान किंवा त्याच्या सहकाऱ्यांशी बोललो नाही. जोपर्यंत चांगली हिंदी स्क्रिप्ट मिळत नाही तोपर्यंत तो कोणताही हिंदी चित्रपट बनवणार नाही, असेही स्पष्ट केले.

'पठान'ला मिळालेल्या घवघवीत यशानंतर बॉलिवूड पुन्हा एकदा भरारी घेत आहे. विजय किरगंदूर यांना एका मुलाखतीत याचा साउथ सिनेमावर परिणाम होईल का? असा प्रश्न विचारला होता, त्यावेळी विजय म्हणतात, 'मला वाटत नाही की याचा कोणत्याही चित्रपटसृष्टीवर परिणाम होईल. 'पठान'च्या यशामुळे चित्रपट निर्मात्यांना चांगले चित्रपट बनवण्यास प्रोत्साहन मिळेल. बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीसाठी हे चांगले आहे कारण प्रेक्षक थिएटरमध्ये येत आहेत. बघण्यासारखे बरेच चित्रपट आहेत. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. लोकांना थिएटरमध्ये 'लार्जर दॅन लाइफ' चित्रपट पहायचे आहेत.

'पठान' चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे. शाहरुख खानसोबत चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम असून सलमान खान या चित्रपटात पाहुणा कलाकार आहे. तर डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा हे देखील प्रमुख भूमिकेत आहे. 250 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'पठान'ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. प्रेक्षकांच्या नजरा आता शाहरुखच्या आगामी 'जवान' आणि 'डंकी' या चित्रपटांकडे लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Khushi Mukherjee: कारला धडकली दुसऱ्याची गाडी; अभिनेत्री फटाके विक्रेत्यावरच संतापली; भररस्त्यात अभिनेत्री मुखर्जीचा राडा

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने अनोख आंदोलन

Saam Impact: धुळ्यात दूध भेसळ! साम टीव्हीच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग, FDAच्या अधिकाऱ्यांची कारवाईसाठी धावपळ|VIDEO

PM Kisan Update : पीएम किसान योजनेचे २००० रुपये खात्यात कधी जमा होणार? कोट्यवधी शेतकऱ्यांना दिवाळीत मिळाली गोड बातमी

Rupali Bhosle Photos: निळ्या पैठणी साडीमध्ये रूपालीचा मराठमोळा साज, फोटो पाहाच

SCROLL FOR NEXT