Leo First Look Out: तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता थलापती विजय (Thalapathy Vijay)आज त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. वाढदिवसानिमित्त अभिनेता विजय थलापतीचा आगामी चित्रपटाच फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. नुकताच निर्मात्यांनी चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केला आहे. जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
"#LeoFirstLook! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा @Actorvijay Anna! तुमच्याशी हात मिळवून पुन्हा आनंद झाला ना! एक धमाका!," दिग्दर्शक लोकेश यांनी म्हटले आहे, अधिकृत ट्विटर हँडलवर लिओचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केले. विजयच्या ४९ व्या वाढदिवसाच्या खास दिनी प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.(Entertainment Marathi NEWS)
लिओ चित्रपटाच्या फर्स्ट लूक पोस्टरमध्ये, विजय रूबाबदार अंदाजात दिसतो आहे. विजयने हातात हातोडा घेतला असून आजूबाजूला जंगली प्राणी दिसत आहे. थलापती विजयसह त्रिशा कृष्णन चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय दत्त या चित्रपटात थलापती विजयच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. थलापती विजय ४०च्या दशकातील गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.
‘लिओ’ हा चित्रपट यावर्षी १९ ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तमिळसह चित्रपट तेलुगु, कन्नड आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित होईल लोकेश कनागराज दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांसाठी अॅक्शन आणि ड्रामा चित्रपट असेल. लिओ हा दिग्दर्शक लोकेश कनागराजच्या अॅक्शन थ्रिलर युनिव्हर्समधला पुढचा भाग आहे, ज्याला चाहत्यांनी लोकेश सिनेमॅटिक युनिव्हर्स उर्फ LCU म्हटले आहे. थलापती विजय या चित्रपटात लिओ या शीर्षकाची भूमिका साकारत असल्याचे सांगितले आहे.
गौतम वासुदेव मेनन, अर्जुन सर्जा, मायस्किन, मन्सूर अली खान, प्रिया आनंद, अर्जुन दास, मॅथ्यू थॉमस आणि इतर सहाय्यक भूमिकांसह बॉलीवूड स्टार संजय दत्त या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. 'वारीसू' चित्रपटानंतर आता चाहते थलापती विजयच्या 'लिओ' या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा एक अॅक्शन चित्रपट असणार आहे. सध्या अभिनेता थलापती विजय चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.