Parineeti- Raghav Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Parineeti Chopra Wedding Dress : परिणीतीच्या लेहेंग्यासाठी 3 महिन्यांची मेहनत, ओढणीनेच जास्त भाव खाल्ला

Parineeti-Raghav Wedding Photo: परिणीतीने लग्नामध्ये पेस्टल रंगाचा अत्यंत आकर्षक असा सिंपल लेहेंगा परिधान केला आहे.पारंपारिक पंजाबी गेटअपमध्ये परिणीती खुपच सुंदर दिसत आहे.

Manasvi Choudhary

Parineeti- Raghav Wedding:

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे नेते राघव चड्ढा(Raghav Chadha) नुकतेच लग्नबंधनात अडकले. शाहीथाटात अंत्यत दिमाखदार पध्दतीने या दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला. उदयपूर येथील लीला पॅलेसमध्ये या दोघांनी विधीवत पध्दतीने लग्न केले. लग्नादरम्यान, परिणीती आणि राघवचीच सगळीकडे चर्चा होती. या कपलच्या लग्नाबाबत दोघांचेही चाहते खूपच उत्सुक होते. लग्नातील फोटो समोर येण्याची चाहते वाट पाहत होते.

नुकतेच परिणीती आणि राघव यांच्या लग्नातील फोटो व्हायरल झाले आहेत.ज्यामध्ये ब्रायडल लूकमध्ये अभिनेत्री परिणीती अतिशय सुंदर, मनमोहक दिसते आहे. अभिनेत्रीचा अतिशय सुंदर असा लग्नाचा साज पाहून चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. परिणीतीचा ब्रायडल लूक केवळ सुंदरच नाही तर खूप खास आहे

परिणीतीने लग्नामध्ये पेस्टल रंगाचा अत्यंत आकर्षक असा सिंपल लेहेंगा परिधान केला आहे.पारंपारिक पंजाबी गेटअपमध्ये परिणीती खुपच सुंदर दिसत आहे. न्यूड मेकअपसह परिणीतीने गळ्यामध्ये हेवी ज्वेलरी घातली आहे . विशेष म्हणजे परिणीतीने डोक्यावर घेतलेल्या लांबलचक ओढणीवर पती राघवचे नाव कोरले आहे. लग्नामध्ये नववधूच्या रुपासाठी परिणीती चोप्राने केलेला सिंपल पण तितकाच आकर्षित लूक सर्वांचे लक्ष वेधून गेला.

परिणीतीने लग्नासाठी परिधान केलेला हा लेहेंगा मनीष मल्होत्राने डिझाईन केला आहे. तीन महिने या लेहेंग्यावर काम करण्यात आले. टोनल इक्रू बेसपासून बनवलेल्या या लेहेंग्यात सिक्विनने हातकाम केले आहे. दुपट्ट्याची विशेष खासियत म्हणजे दुपट्ट्यावर पती राघवचे नाव बदला वर्कने कोरण्यात आले आहे. लेहेंग्यावर परिणीतीने हिऱ्यांचा हार, मांग टिक्का, कानातले घातले आहे जे तिचा ब्रायडल लूक पूर्ण करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT