Priyanka copra canva
मनोरंजन बातम्या

Priyanka copra:देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या हातावर दिसला खास टॅटू; नेमका तो चेहरा कुणाचा? पोस्टवर तुफान चर्चा

Priyanka copra tattoo: बॉलिवूडची क्विन प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टीव असते. तिच्या आताच्या पोस्टमध्ये तिने एक स्पेशल व्यक्तिचा टॅटू काढला आहे. हा टॅटू चाहत्यांच्या नजरेत कैद झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री प्रियांका चोप्राची चाहत्यांमध्ये खूप चर्चा सुरू आहे. प्रियांका नेहमीच तिच्या सोशल मीडिया पेजवर अ‍ॅक्टीव असते. सध्या ती फॅमिली सोबत सुट्टी एन्जॉय करतेय. प्रियांकाच्या सोशल मीडिया हॅन्डलवर तिने काही फोटो पोस्ट केलेत. त्यात प्रियांका तिचा नवरा निक आणि तिची लहान लेक मालती आहे. हे तिघे फ्रान्समध्ये फिरायला गेले आहेत. पोस्टमध्ये ते तिघे एन्जॉय करताना दिसत आहेत. या पोस्टमुळे ती खूप चर्चेत आहे. तिच्या चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये 'एक आंनदी कुटुंब' असे म्हंटले आहे.

बॉलिवूडची क्विन प्रियांका चोप्रा इंटरनेटवर फोटो शेअर करत असते. तिचा चाहतावर्ग चांगलाच तगडा आहे. त्याने चाहत्यांमध्ये ती सतत चर्चेचा विषय ठरते. चाहते नेहमी तिच्या पोस्टची वाट बघत असतात. प्रियांकाच्या या पोस्टमध्ये चाहत्यांना एक खास गोष्ट दिसली. त्यात तिच्या हातावर एक खास टॅटू त्यांना दिसला. चाहत्यांनी कमेंट्स मध्ये लगेचच तिला या बद्दल विचारपूस केली. या अगोदरच्या पोस्टमध्ये कोणालाच हा टॅटू दिसला नव्हता. चाहत्यांच्या तीक्ष्ण नजरेला हा टॅटू शेवटी दिसलाच.

प्रियांका चोप्रा बॉलिवूडची एक उत्तम अभिनेत्री आहे. तिने खूप वर्ष चित्रपटसृष्टीत काम करून नाव कमवले आहे. तिने अनेक मोठ्या चित्रपटात काम केलं आहे. त्यामुळे तिच्या चाहत्या वर्गाला तोड नाही. अश्यातच प्रियांकाने तिच्या पेक्षा १० वर्ष लहान असणाऱ्या निकसोबत लग्न केले. या गोष्टीमुळे पुन्हा ती चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनली होती. आता तिला एक लहान मुलगीसुद्धा आहे. तिचे नाव प्रियांकाने मालती ठेवले आहे. आता ते तिघेही फ्रान्समध्ये मस्त आनंदात राहात आहेत.

प्रियांकाने तिच्या फॅमिलीसोबतचे फोटो नुकतेच इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यात तिच्या एका फोटोत तिच्या चाहत्याला मालतीचा टॅटू दिसला. मालती प्रियांकाची लहान मुलगी आहे. त्यावर चाहत्यांनी ' टॅटू खूप क्युट आहे.' अश्या कमेंट्स केल्या. मात्र काही जणांना हा टॅटू दिसलाच नाही. हा बारकाईने पाहिला तरच दिसणारा टॅटू आहे. याच कारण म्हणजे हा टॅटू लहान आकाराचा आहे. आता याचीच चर्चा प्रियांका चाहत्यांमध्ये रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT