The Kashmir Files Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vivek Agnihotri’s Reaction: अमीर खानच्या लेटेस्ट अॅडवर संतापले विवेक अग्निहोत्री, म्हणाले 'हिंदूंची थट्टा करता...'

हिंदूंच्या भावना दुखवल्याचा आरोप अमीर खान आणि कियारा अडवाणी करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अमीर खान आणि कियारा अडवाणी त्यांच्या लेटेस्ट अॅडमुळे चर्चेत आहेत. दोन्ही कलाकारांनी एका बँकेच्या अॅडमध्ये एकत्र काम केले आहे आणि त्यामुळे त्यांना ट्रोल सुद्धा केले जात आहे. काही युजर्सनी त्यांच्या या अॅडला नापसंती दर्शवली आहे. या अॅडमुळे दोघांनाही टार्गेट केले जात आहे. हिंदूंच्या भावना दुखवल्याचा आरोप या दोघांवर करण्यात आला आहे. आता या प्रकाणावर 'द काश्मीर फाईल्स'चे निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

विवेक अग्निहोत्रींनी अमीर खान आणि कियारा अडवाणीच्या (Aamir Khan Kiara Advani) या लेटेस्ट अॅडवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अॅड ट्विटरवर शेअर करत विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले आहे की, 'मला हे समजत नाहीये की सामाजिक आणि धार्मिक परंपरा बदलण्यासाठी बँक केव्हापासून जबाबदार झाली आहे. मला वाटते की एयू बँकेने भारतातील भ्रष्ट बँकिंग व्यवस्था बदलून तिला सक्रिय दाखवायला हवे होते. हे बावळट लोक हिंदूंची थट्टा करतात आणि नंतर म्हणतात की हिंदू आम्हाला ट्रोल करतात.'

ही अॅड हिंदू परंपरेच्या विरोधात बनवलेली आहे असे बोलले जात आहे. अॅडमध्ये आमिर खान आणि कियारा पती-पत्नीच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहेत. लग्नानंतर अमीर खान कियाराच्या घरी राहायला जात आहे, असे या अॅडमध्ये दाखविण्यात आले आहे. मुलीचे वडील आजारी आहेत आणि मुलगा त्यांची काळजी घेण्यासाठी पत्नीसोबत राहायला जात आहे. वर त्याच्या नवीन घरात प्रवेश करतो, जिथे त्याचे स्वागत केले जाते. यानंतर आमिर एका बँकेत दिसतो आणि म्हणतो- 'शतकांपासून चालत आलेली परंपरा का सुरू ठेवायची? त्यामुळे आम्ही बँकिंग परंपरेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहोत.

हिंदूंच्या परंपरेच्या विरोधात ही जाहिरात दाखवल्याबद्दल आमिर खानवर कारवाई केली जात आहे. या अॅडबद्दल अनेक यूजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. आमिर खान कोणत्याही जाहिरातीसाठी किंवा चित्रपटांसाठी ट्रोलच्या निशाण्यावर येण्याची ही पहिली वेळ नाही. 2016 मध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट त्यांच्या एका विधानामुळे ट्रोल झाला होता. त्यांच्या वक्तव्यात त्यांनी म्हटले होते की त्यांची पत्नी किरण राव यांना भारतात असुरक्षित वाटते. त्यांच्या या वक्तव्याने लोक कमालीचे थक्क झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT