Bollywood Upcoming Movie Doctor G: आयुष्मानचा 'डॉक्टर जी' अडल्ट चित्रपट; तरुणांचं करेल भरपूर मनोरंजन, ही आहे खास गोष्ट

डॉक्टर जी' हा एक कॉमेडी चित्रपट असून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कुठेही कमी पडणार नाही. हा चित्रपट प्रेक्षकांना एक नवीन अनुभव देईल.
Doctor G Trailer
Doctor G Trailer Saam Tv
Published On

मुंबई: आयुष्मान खुराना आणि जंगली पिक्चर्स सामाजिक संदेश देणारे वैविध्यपूर्ण चित्रपटांसाठी ओळखले जातात. 'बधाई हो' आणि 'बरेली की बर्फी' हे त्यांनी एकत्रित केलेले चित्रपट (Movie) आहेत. 'डॉक्टर जी' हा चित्रपट घेऊन आयुष्मान खुराना आणि जंगली पिक्चर्स पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आयुष्मानने 'विकी डोनर'पासून ते 'शुभ मंगल झ्यादा सावधान' सारख्या वेगवगेळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये काम केला आहे. त्याच्या चित्रपटांच्या कथा जरी वेगवगेळ्या असल्या तरी त्यातून कौटुंबिक मनोरंजन होते. त्याचा आगामी चित्रपट 'डॉक्टर जी' कॉमेडी-ड्रामा (Comedy) आहे. या चित्रपटामध्ये आयुष्मान स्त्रीरोग तज्ज्ञाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाला 'ए' प्रमाणपत्र मिळाले आहे, याचा अर्थ हा चित्रपट केवळ 18 वर्षांवरील प्रेक्षक पाहू शकतात. आयुष्मानच्या करियरमध्ये हे पहिल्यांदाच घडत आहे.

अभिनेता आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) 'डॉक्टर जी' (Doctor G) हा चित्रपट एका महत्त्वाकांक्षी ऑर्थोपेडिक सर्जनचा प्रवास आहे. एक पुरुष डॉक्टर स्त्रियांचे वर्चस्व असलेल्या विभागात प्रवेश करतो. महिलांचे वर्चस्व असलेल्या विभागात एका पुरुषाला प्रचंड धडपड करावी लागते. या चित्रटामध्ये एका पुरुष डॉक्टरचा कॅम्पसमध्ये राहण्यापासून ते डॉक्टर बनण्यापर्यंतचा प्रवास दाखविण्यात आला आहे. चित्रपटात वास्तविक जीवनातील घटनांचे विनोदी पद्धतीने चित्रीकरण केले असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे.

Doctor G Trailer
Happy Birthday Amitabh Bachchan : बिग बींकडून चाहत्यांना 'शॉल्लिड' गिफ्ट

प्रेक्षकांना ओटीटीवर अनफिल्टर्ड आणि बोल्ड कंटेन्ट सहज उपलब्ध होतो. तसाच तो प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणे योग्य आहे. जंगली पिक्चर्स आणि आयुष्मान खुराना यांनी चित्रपटात बदल न करण्याचा आणि 'ए' प्रमाणपत्र मिळवण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे. कॉमिक फिक्शन असलेला चित्रपट आहे त्याच स्वरूपात प्रेक्षकांपुढे आणणे हे चित्रपटासाठी चांगले आहे असे जंगली पिक्चर्स आणि आयुष्मान खुराना म्हणणे आहे.

जंगली पिक्चर्सच्या सीईओ अमृता पांडे म्हणाल्या, "हा चित्रपट बोल्ड आहे, मनोरंजक आहे, तरीही स्टिरियोटाइप ब्रेक करत आहे, ज्याची आयुष्मान खुराना चित्रपटाकडून अपेक्षा केली जाऊ शकते. हा एक अडल्ट चित्रपट असून यात बोल्डनेस आहेच परंतु त्यात संवेनशीलता आणि मनोरंजन सुद्धा आहे. हा चित्रपट तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत नक्कीच पाहू शकतात. आम्ही चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सादर करण्यासाठी तयार आहोत, चित्रपटाचा कालावधी 2 तासांपेक्षा कमी आहे, त्यामुळे डॉक्टर जी चित्रपटाकडे एक संधी आहे.

दिग्दर्शक अनुभूती कश्यप म्हणतात की, "नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सर्व अॅक्शन, थ्रिलर आणि फॅन्टसीवर आधारित चित्रपटांपैकी 'डॉक्टर जी' हा एक मजेदार कॉमेडी-ड्रामा आहे. प्रेक्षकांना नवीन अनुभव देईल. ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटात असलेल्या विनोदीची आणि मनोरंजनाची ही फक्त एक झलक आहे. मला आनंद आहे की प्रेक्षकांना संपूर्ण चित्रपट लवकरच बघायला मिळेल, जो त्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहील. "

अनुभूती कश्यप दिग्दर्शित आणि सुमित सक्सेना, सौरभ भारत, विशाल वाघ आणि अनुभूती कश्यप लिखित, डॉक्टर जी हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. जंगली पिक्चर्सच्या आगामी चित्रपटांमध्ये 'वो लडकी है कहाँ?', 'डोसा किंग', 'उलझ' आणि 'क्लिक शंकर' या चित्रपटांचा समावेश असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com