Marathi Movie Boyz 3 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Boyz 3 Trailer: धैर्य, ढुंग्या आणि कबीर पुन्हा प्रक्षकांच्या भेटीला; ‘बॉईज ३’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

‘तुम्हाला तुमच्या भाषेचा माज दाखवता येतो तर आम्हाला आमच्या भाषेची लाज राखता येते’.

Shivani Tichkule

मुंबई - धैर्य, ढुंग्या आणि कबीर हे पुन्हा एकदा प्रक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे.‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’ ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः दंगा घातल्यानंतर आता ‘बॉईज ३’ हा चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच ‘बॉईज ३’च्या या चित्रपटाचा (Movie) धमाल ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

चित्रपटाच्या टीझरमध्ये धैर्य, ढुंग्या आणि कबीर हे तीन पात्र दिसून येत आहे. हे तिघेही दाक्षिणात्य पेहरावामध्ये दिसत आहे. ट्रेलरमध्ये हे त्रिकूट आणि विदुला करत असलेल्या प्रवासाची झलक दाखवण्यात आली आहे. त्यांच्या या प्रवासात आलेलं विदुला नावाचे वळण कोणत्या ठिकाणी या तिघांना घेऊन जाणार हे पहिल्या मिळणार आहे.

हे देखील पाहा -

ट्रेलरमधील एक संवाद चाहत्यांचे मनं जिंकून घेणारा आहे तो म्हणजे, ‘मराठीचा माज बेळगावात नाही दाखवायचा तर कुठे दाखवायचा’, ‘तुम्हाला तुमच्या भाषेचा माज दाखवता येतो तर आम्हाला आमच्या भाषेची लाज राखता येते’.

'बॉईज 3' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट कधी एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतो, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. १६ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘बॉईज’ चित्रपटामधील धैर्य, ढुंग्या आणि कबीर या तिघांनी प्रेक्षकांना अगदी वेड लावलं. चित्रपटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिल्यानंतर आता पुन्हा एकदा ‘बॉईज ३’च्या टीझरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. १६ सप्टेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

Crime News: पुण्यात टोळी युद्धाचा भडका, आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवॉरला सुरुवात

SCROLL FOR NEXT