Ti Mazi Prem Katha Cast Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ti Mazi Prem Katha Trailer: मराठीतल्या नव्या कोऱ्या जोडीची 'ती माझी प्रेमकथा'; ट्रेलर पाहून हृदय धडधडू लागेल

येत्या १४ ऑक्टोबरला 'ती माझी प्रेम कथा' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात प्रेमकथा नसून आजच्या तरुण पिढीला चित्रपटाला संदेश मिळणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: प्रत्येकजण आपल्या आयुष्यात एकदा का होईना प्रेमात (Love) पडतो. पण प्रेमात पडणारी व्यक्ती त्याला वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देते. काहींचे प्रेम यशस्वी होते तर काहींचे नाही अयशस्वी होते. त्यामागे असतो तो एक विश्वास. अशाच प्रेमाच्या विश्वासातील प्रेमकथा घेऊन, अतिविश्वासामुळे झालेला प्रेमाचा घात घेऊन 'फिल्मी टाईम प्रोडक्शन' सह आणि 'कनिष्क अँड त्रिगेश एंटरटेनमेंट' सोबत निर्माते राजकुमार देगलूरकर, ओमप्रकाश बुक्कावार निर्मित 'ती माझी प्रेमकथा' या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर (Social Media) प्रदर्शित झाला आहे.

येत्या १४ ऑक्टोबरला हा चित्रपट (Movie) प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात प्रेमकथा नसून आजच्या तरुण पिढीला एक संदेश मिळणार आहे. ट्रेलरची सुरुवात अभिनेता उपेंद्र लिमये यांच्या आवाजात सुरू झाल्याने त्यांच्या तोंडून ही प्रेमकथा ऐकण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अभिनेत्री पद्मिनी कांबळे आणि अभिनेता तुषार धकिते या नव्या जोडीने तर चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये शाबासकी मिळवली आहे.

अभिनेता कपिल कांबळेंच्या अभिनयाची जादूही ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. दिग्दर्शक सूर्या यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा आणि स्क्रीनप्ले अशा तीनही जबाबदाऱ्या लिलया सांभाळत चित्रपट बनवला आहे. या रोमँटिक चित्रपटाच्या संगीताची धुरा संगीतकार राजवीर गांगजी यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांना १४ ऑक्टोबरची प्रतिक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमाळमध्ये राष्ट्रवादीला धक्का, बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

विद्यार्थ्याचं हैवानी कृत्य; ४० वर्षीय महिलेवर शेतात बलात्काराचा प्रयत्न, नकार देताच डोक्यात विळा घातला

Peacock Lifespan: किती वर्षे जिवंत राहतो भारताचा राष्ट्रीय पक्षी, उत्तर वाचून व्हाल थक्क

Dharmendra Health Update:ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली; कुटुंबातील सर्व सदस्य पोहोचले रुग्णालयात

Pani Puri Receipe: नेहमीचं चटपटीत पाणी सोडा, पाणीपुरीसाठी ५ मिनिटांत बनवा स्ट्रीट स्टाईल झणझणीत पाणी

SCROLL FOR NEXT