Baipan Bhari Deva  Saam TV
मनोरंजन बातम्या

Baipan Bhari Deva Trailer Out: धकाधकीच्या आयुष्यात 'ब्रेक' हा हावाच! 'बाईपण भारी देवा'चा ट्रेलर प्रदर्शित

Kedar Shinde New Movie: 'बाईपण भारी देवा' या त्यांच्या आगामी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Marathi Movie Baipan Bhari Deva Trailer Released : केदार शिंदे यांच्या 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटानंतर 'बाईपण भारी देवा' या त्यांच्या आगामी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला.

केदार शिंदे 'अगं बाई अरेच्चा'नंतर 'बाईपण भारी देवा' हा महिलांवर आधारित चित्रपट घेऊन आपल्या भेटीला येणार आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील गाणी प्रदर्शित झाली होतो आणि हिट देखील ठरली होती. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. (Latest Entertainment News)

कसा आहे 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा ट्रेलर

'बाईपण भारी देवा' चित्रपटाच्या ट्रेलरची सुरूवात वंदना गुप्ते यांच्यापासून होते. त्यांना मंगळा गौर स्पर्धेत भाग घ्यायचा असतो. त्यासाठी त्या टीम तयार करत असतात. यानंतर आपल्याला त्यांच्या पाच बहिणींची ओळख होते. या पाचजणी त्यांच्या-त्यांच्या आयुष्यात खूप बिजी असतात. आदर्श सून, पत्नी, आई या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळा त्या नोकरी देखील करत असतात.

जबाबदाऱ्या आणि वेळ यातून मार्ग काढत त्या सर्वजणी 'मंगळा गौर' स्पर्धेत सहभागी होण्याच्या निर्णय घेतात आणि तयारीला लागतात. यासगळ्यात या बहिणींना त्यांच्या घरच्यांचं खूप ऐकून घ्यावं लागत. त्यांच्या जीवनातही सर्व अडथळे पार करत त्या सर्वजणी स्पर्धात भाग घेऊन सादरीकर करतात.

ट्रेलमध्ये बायकांना येणार अडथळे दाखविण्यात आले आहेत. पण त्या त्यावर कशी मात करतात हे आपल्याला चित्रपटामध्ये पाहायला मिळेल. थांबून श्वास घ्यायला नसणाऱ्या स्त्रियांना ब्रेक घ्यायला लावणार हा चित्रपट आहे.

३० जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपाली परब, शरद पोंक्षे. पियुष रानडे, स्वप्निल राजशेखर अशी तगडी स्टारकास्ट आहे. (Celebrity)

केदार शिंदे यांचा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. केदार यांच्या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. नेटकऱ्यांना हा ट्रेलर खूप आवडला आहे.

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

SCROLL FOR NEXT