शिव ठाकरे वीणा जगताप Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: लव्ह बर्ड्स शिव-वीणामध्ये नेमकं काय घडलं? अभिनेत्रीने दिलं चकित करणारं उत्तर

'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या सीझनमधील लव्ह बर्डस शिव आणि वीणामध्ये काय घडलं हे फारच कमी लोकांना माहित आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: 'बिग बॉस' (Bigg Boss) म्हटलं तर चर्चा तर होणारच असे काहीसे वातावरण संपूर्ण देशभर आहे. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषणांमध्ये नुकताच 'बिग बॉस' सुरू झाला आहे. 'बिग बॉस मराठी ४' पहिल्या तीन सीझनप्रमाणे गाजत आहे. 'बिग बॉस मराठी २'चा विजेता शिव ठाकरे 'बिग बॉस हिंदी'मध्ये दाखल झाला आहे. हिंदी बिग बॉसमध्ये त्याने त्याच्या जादूने प्रेक्षकांची मने जिकंण्यास सुरूवात केली आहे. शिव ठाकरे (Shiv Thakare) 'बिग बॉस मराठी २' जिंकल्यानंतरही चर्चेत आला होता तो म्हणजे त्याच्या आणि अभिनेत्री वीणा जगतापच्या (Veena Jagtap) अफेअरमुळे. या दोघांचे पुढे काय झाले हे फारच कमी लोकांना माहित आहे. चला जाणून घेऊया पुढे काय झाले शिव आणि वीणाच्या नात्याचे.

शिव आणि वीणाच्या केमिस्ट्रीमुळे 'बिग बॉस मराठी २' प्रचंड गाजला होता. या दोघांमुळे 'बिग बॉस'च्या घरात प्रेमाचे वारे वाहू लागले होते. टास्क दरम्यान वीणाने शिवाच्या नावाचा टॅटू देखील हातावर गोंदवून घेतला होता. शिवने जेव्हा 'बिग बॉस' शो जिंकला होता तेव्हा वीणालाही खूप आनंद झाला होता. 'बिग बॉस'नंतर देखील दोघे सोशल मीडियावर (Social Media) एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसले होते. परंतु काही महिन्यातच दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्या दोघांमध्ये नेमकं काय झालं होत?

बिग बॉसच्या (Bigg Boss) घरातून बाहेर आल्यानंतर काही महिन्यात शिव आणि वीणाच्या ब्रेकअपच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या होत्या. दोघे एकत्र गोव्याला देखील गेले होते. शिवचा वाढदिवस देखील वीणाने गोव्यामध्ये साजरा केला होता. दोघांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. मात्र एक दिवस अचानक दोघांनी सोशल मीडियावरून एकमेकांचे फोट काढून टाकले आणि त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपची बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर वीणाने तिच्या हातावरील शिवाच्या नावाचा टॅटू हटवल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला होता.

शिव आणि वीणा यांनी त्यांच्या ब्रेकअपविषयी कधीच काही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु एका युझरने विचारलेल्या प्रश्नामुळे वीणा खूप भडकली होती. वीणाने इंस्टाग्रामवर 'आस्क मी एनिथिंग' हा सेगमेंट घेतला होता. त्या सेगमेंटमध्ये वीणाच्या एका चाहत्याने "शिव दादा आणि तुझ्यात काय सुरू आहे"? असा प्रश्न विचारला. तेव्हा वीणा चांगलीच भडकली आणि तिने तिच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले. तेव्हा ती म्हणाली होती की, "पहिलं आणि शेवटचं मी कोणालाही माझ्या पर्सनल आयुष्याशी निगडित कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास बांधील नाही... थोडी नैतिकता बाळगा आणि आम्हला थोडा श्वास घेऊ द्या... मी तुम्हाला कधी तुमच्या आयुष्यात काय चालू आहे काय चालू नाही असे विचारले आहे का, मी नेहमी माझ्यापुरती मर्यादित असते."

वीणाच्या या उत्तराने शिव आणि तिच्यामध्ये काहीतरी बिनसल्याचे लोकांच्या लक्षात आले. या दोघांचे ब्रेकअप झाल्याचेही यावरून उघड झाले होते. शिव सध्या बिग बॉस हिंदीमध्ये सहभागी झाला आहे. तर वीणा सध्या मालिकांमध्ये काम करत आहे. त्यांच्या ब्रेकअपनंतर ते दोघेही एकत्र आलेले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

SCROLL FOR NEXT