Elvish Yadav Saam Tv
मनोरंजन बातम्या

Elvish Yadav: 'मी आणि माझे कुटुंब...'; गोळीबाराच्या घटनेनंतर एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया

Elvish Yadav: काल एल्विश यादव याच्या घरावर अज्ञात लोकांनी गोळीबार केला होता. त्यानंतर आज एल्विश यादवने एकूण परिस्थीतीबद्दल माहिती देत चाहत्यांचे आभार मानले.

Shruti Vilas Kadam

Elvish Yadav: युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी २ चा विजेता एल्विश यादवच्या गुरुग्राम येथील घरावर रविवारी सकाळी हल्ला झाला. दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्याच्या १६ बीएचके बंगल्यावर गोळीबार केला. २५ हून अधिक राउंड गोळीबार करण्यात आला. घटनेच्या वेळी एल्विशचे संपूर्ण कुटुंब घरी होते. सुदैवाने, कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. आता या घटनेनंतर पहिल्यांदाच एल्विशने एक पोस्ट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

एल्विशने चाहत्यांचे आभार मानले आहेत

सोमवारी एल्विशने त्याचे पहिले विधान प्रसिद्ध केले. त्याने लिहिले, "मी सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छितो. माझे कुटुंब आणि मी पूर्णपणे ठीक आहोत. तुमच्या प्रार्थना आणि काळजीबद्दल धन्यवाद."

भाऊ रिटोलिया टोळीने जबाबदारी घेतली

या हल्ल्यानंतर काही तासांनी भाऊ टोळीने त्याची जबाबदारी घेतली. भाऊ रिटोलिया नावाच्या हँडलवरून इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकण्यात आली होती, ज्यामध्ये लिहिले होते, "जय भोले की. आज एल्विश यादवच्या घरी गोळीबार झाला. हे नीरज फरीदपूर आणि भाऊ रिटोलिया यांनी केले होते. त्याने बेटिंग अॅप्सचा प्रचार करून अनेक घरे उध्वस्त केली आहेत. ही एक चेतावणी आहे, जो कोणी अशा अॅप्सचा प्रचार करेल त्यालापण अशीच गोळी किंवा फोन येऊ शकतो."

हल्लेखोर गेटवर पोहोचले होते

सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की दोन गोळीबार करणारे बंदुका घेऊन घराच्या गेटकडे धावले आणि गोळीबार करू लागले. खिडक्या, दरवाजे आणि अगदी वरच्या बाल्कनीवरही गोळ्या झाडण्यात आल्या. एका हल्लेखोराने गेटवरून उडी मारली आणि मुख्य दरवाजापर्यंत पोहोचला. एल्विशच्या वडिलांनी सांगितले की, कुटुंबाला सकाळी ५:३० ते ६ च्या दरम्यान गोळ्यांचा आवाज ऐकू आला. ते बाहेर आले तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते. सुमारे २५-३० राउंडचा गोळीबार झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : जोडीदारासोबत शांततेत दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींसाठी दिवस ठरणार गेमचेंजर; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

SCROLL FOR NEXT