Elvish Yadav saam tv
मनोरंजन बातम्या

Elvish Yadav : "तू माझ्याशी लग्न करशील..."; एल्विश यादवने गुडघ्यावर बसून जिया शंकरला केलं प्रपोज, रोमँटिक VIDEO होतोय व्हायरल

Elvish Yadav Proposes To Jiya Shankar : एल्विश यादव आणि जिया शंकर यांचा एक रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात एल्विश जियाला प्रपोज करताना दिसत आहे.

Shreya Maskar

एल्विश यादव आणि जिया शंकर सध्या 'एंगेज्ड सीझन २' शो होस्ट करत आहेत.

एल्विश यादवने अभिनेत्री जिया शंकरला प्रपोज केले.

जिया देखील एल्विशला I Love You बोलते.

टिव्ही स्टार एल्विश यादव गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्या बद्दल डेटिंगच्या अफवा पसरल्या आहेत. अशात आता त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एल्विश यादव टिव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला प्रपोज करताना दिसत आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून जिया शंकर आहे. ज्यामुळे एल्विश-जिया एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगली रंगली आहे.

व्हिडीओत नेमकं काय?

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका कार्यक्रमात एल्विश यादव गुडघ्यावर बसून रोमँटिक अंदाजात जियाला प्रपोज करतो. तो म्हणतो की, "तू माझ्याशी लग्न करशील का?" यावर जिया लाजते आणि म्हणते की, "मी पण तुझ्यावर प्रेम करते आणि मी तुझ्याशी लग्न करेन..." एल्विश हातात गुलाबाचे फुल घेऊन जियाला प्रपोज करतो. एकीकडा या व्हिडीओवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहे. त्यांना शुभेच्छा देताना आणि त्यांच्यावर प्रेम करताना दिसत आहे. तर दुसरीकडे काहींना हे खोटे वाटत असून फक्त शोसाठी केले असल्याचे बोले जात आहे.

'बिग बॉस ओटीटी सीझन २' चा विजेता एल्विश यादव सध्या त्याच्या 'एंगेज्ड सीझन २' शोमुळे चांगलाच चर्चेत आहे. या रिॲलिटी शोमध्ये एल्विश यादव अभिनेत्री जिया शंकरसोबत स्क्रिन शेअर करत आहे. दोघेही या शोचे होस्ट आहेत. हा शो जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळतो. या शोच्या दुसऱ्या सीझनची सुरूवात 2026 च्या व्हॅलेंटाईन डेला(14 फेब्रुवारी) झाली. हा एक प्रेमाचा रोमँटिक शो आहे.

व्हायरल व्हिडीओ मागेचं नेमकं सत्य काय?

एका मिडिया मुलाखतीत जेव्हा जियाला या व्हायरल व्हिडीओ बद्दल विचारण्यात आले. तेव्हा ती म्हणाली की, "माझ्या कुटुंबाला आणि माझ्या बॉयफ्रेडला याबद्दल सर्व माहित होते. हे फक्त या शोसाठी होते. त्यामुळे कोणालाही आश्चर्य वाटलं नाही..." एल्विशने जियाला प्रपोज करणे हे शोच्या कथेचा एक भाग होता. मात्र चाहते आता जियाच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराविषयी जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Update: राज्यात आठ दिवस मुसळधार पाऊस; नदी नाल्यांना येणार पूर

Fact Check: E20 पेट्रोल वापराल, विम्याला मुकाल? गाडीचं नुकसान झाल्यास भरपाई नाही?

Today Horoscope : वृश्चिक राशीसाठी तिप्पट लाभाचा महासंयोग, मकर-मीन राशीत प्रेमाचा वर्षाव; जाणून घ्या तुमचे भविष्य

ठाकरेसेनेचा पुन्हा पोपट मेला, ठाकरेसेनेतील फुटीवर शिक्कामोर्तब

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे निधन; पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT