Eetha trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

'नाचते हुए मरी तो मिसाल बन जाऊंगी'; लावणीसम्राज्ञी विठाबाईंची कहाणी मोठ्या पडद्यावर; 'ईठा'चा शानदार ट्रेलर प्रदर्शित

Eetha trailer: श्रद्धा कपूरच्या ईठा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात रणदीप हुड्डा, नाना पाटेकरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Shruti Vilas Kadam

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी 'ईठा' (Itha) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, यामध्ये श्रद्धा एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळत आहे. आतापर्यंत रोमँटिक आणि हॉरर-कॉमेडी चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी श्रद्धा आता महाराष्ट्राच्या लोककलेचा वारसा मोठ्या पडद्यावर साकारणार आहे. प्रसिद्ध तमाशा आणि लावणी कलाकार विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. ट्रेलरमधील श्रद्धाचा लूक, दमदार संवाद आणि लावणीची झलक पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

दमदार संवादाने सुरू होतो ट्रेलर

'ईठा'चा ट्रेलर ३ मिनिटे २ सेकंदांचा आहे. ट्रेलरची सुरुवात एका प्रभावी संवादाने होते. "तू विचारले होतेस ना—बघूया काय तुटतेय: माझा विश्वास की माझा स्वाभिमान? माझा विश्वास हाच माझा स्वाभिमान होता; तो जेव्हा तुटला, तेव्हा सर्व काही उद्ध्वस्त झाले", हा संवाद लक्ष वेधून घेतो. या संवादातून विठाबाईंच्या आयुष्यातील संघर्ष आणि त्यांचा स्वाभिमानी स्वभाव पाहायला मिळतो.

विठाबाईंचा संघर्षमय प्रवास उलगडणार

विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर या महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा आणि लावणी कलाकार होत्या. आपल्या कलेच्या जोरावर त्यांनी लोकनाट्य क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, त्यांचा प्रवास सोपा नव्हता. अनेक अडचणी, संघर्ष आणि आव्हानांचा सामना करत त्यांनी लोककलेत आपले मोठे नाव कमावले. 'ईठा' चित्रपटातून त्यांचे वैयक्तिक आयुष्य, कलेप्रती असलेली निष्ठा आणि यशासाठी केलेला संघर्ष प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

रणदीप हुड्डा आणि नाना पाटेकरही महत्त्वाच्या भूमिकेत

या चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत अभिनेता रणदीप हुड्डा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तो अण्णा सावंत मर्चंट हे पात्र साकारत आहे. याशिवाय मोहम्मद झीशान अय्युब, अनंत जोशी, सिद्धार्थ जाधव, अक्षरा सिंग आणि उल्का गुप्ता हे कलाकारही चित्रपटात आहेत. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचीही महत्त्वाची भूमिका पाहायला मिळणार आहे.

लक्ष्मण उतेकर यांचे दिग्दर्शन

'ईठा' चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अजय-अतुल यांनी सांभाळली आहे. श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असलेला 'ईठा' हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा इतिहास आणि एका महान कलाकाराचा संघर्ष मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी या चित्रपटातून मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : सारसबागजवळ बंद कारमध्ये आढळला कुजलेला मृतदेह, २५ वर्षाच्या तरूणासोबत नेमकं काय झालं?

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Political News: मोठी बातमी! शिंदेसेनेच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

Water Bottle Designs Secrets: पाण्याच्या बाटल्यांवर नागमोडी रेषा का असतात? जाणून घ्या यामागचे नेमके कारण

दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सुका चारा अन् मुरघासाचे दर निश्चित

SCROLL FOR NEXT