बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि मिमी चक्रवर्तीला ईडीने बजावले समन्स.
1xBet बेकायदेशीर बेटिंग अॅप जाहिरातीसंदर्भात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश.
हा तपास मोठ्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा भाग असल्याची शक्यता.
ED Summons to Urvashi Rautela : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला अडचणीत सापडली आङे. 1xBet बेटींग अॅप्समधील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील ईडीने आरोपांवरुन उर्वशीला समन्स जारी करण्यात आले आहेत. उर्वशी व्यतिरिक्त माजी खासदार मिमी चक्रवर्ती यांनाही समन्स जारी झाले आहे. बेकायदा ऑनलाईन बेटिंग अॅप्सच्या विरोधात ईडीने कारवाई केली आहे.
ईडीने उर्वशी रौतेलाला १६ सप्टेंबर रोजी ईडीच्या दिल्ली मुख्यालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. याआधी १५ सप्टेंबर रोजी माजी खासदार मिमी चक्रवर्ती यांना ईडीच्या मुख्यालयात हजर व्हावे लागणार आहे. या प्रकरणी भारताचे माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांची देखील चौकशी होणार असल्याचे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उर्वशी रौतेला आणि मिमी चक्रवर्ती यांना 1xBet अॅपच्या जाहिरातीबाबत चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या चौकशीत दोघींना जाहिरातीसाठी पैसे कसे आणि केव्हा मिळाले, याची माहिती विचारली जाणार आहे. हा तपास मोठ्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा एक भाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात याआधी ईडीने अनेक प्रसिद्ध लोकांची चौकशी केली आहे. जून २०२५ मध्ये हरभजन सिंह, युवराज सिंह, सुरेश रैना, अभिनेता सोनू सूद अशा सेलिब्रिटींनी 1xBet अॅपसह अन्य बेटींग अॅपच्या जाहिरातीसंदर्भात समन्स पाठवले होते. ४ सप्टेंबर रोजी शिखर धवनला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. ऑगस्टमध्ये सुरेश रैनानेही दिल्लीला हजर होऊन चौकशीला उत्तर दिले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.