KBC Winner News SAAM TV
मनोरंजन बातम्या

KBC Winner News : रातोरात करोडपती झाला बिहारचा रिक्षावाला, एका कॉलने बदलले नशीब

KBC News : KBCच्या हॉट सीटवर बसून पारस मणि सिंह करोडपती झाले. त्यांच्या यशाचा प्रवास जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बिहारच्या मुझफ्फरपूर येथील रहिवासी असलेल्या एका ई-रिक्षा चालकाने असा चमत्कार केला की, आता लोक त्याच्यासोबत सेल्फी काढू लागले आहेत. टोटो चालवत हा व्यक्ती 'कौन बनेगा करोडपती' (KBC) च्या हॉट सीटवर पोहोचला अन् करोडपती झाला.

एका न्यूज चॅनलने घेतलेल्या मुलाखतीनुसार, गेली 20 वर्षे तो 'कौन बनेगा करोडपती' साठी (Kaun Banega Crorepati) अथक परिश्रम करत होता आणि आता या प्रयत्नांना यश आले. त्याने 12 लाख 50 हजार रुपये जिंकले. या विजयामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. ते सुरुवातीपासून केबीसी खेळत आहे आणि 2003 पासून प्रयत्न करत होते. मध्यांतरी अनेक वेळा कॉल आला, पण निवड झाली नाही.

पारस मणि सिंहने पुढे मुलाखतीत सांगितले की, 2019 आणि 2021 दरम्यान कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटामुळे त्यांना त्यांचे दुकान बंद करावे लागले. यानंतर त्यांनी कुटुंबियांच्या मदतीने टोटो रिक्षा खरेदी करून ती चालवू लागले. या काळात त्यांचे उत्पन्न 500 ते 700 रुपये प्रतिदिन होते, ज्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालला. दरम्यान, ते केबीसीसाठी प्रयत्न करत राहिले आणि शेवटी त्यांना फोन आला, ज्याने त्याचे नशीब बदलले. मात्र, एका प्रश्नाचे उत्तर न देता आल्यामुळे त्यांना खेळ सोडावा लागला.

केबीसीमध्ये विजेतेपद मिळवल्यानंतर पारस मणि सिंह यांनी सांगितले की, कॉलेजच्या दिवसांमध्ये मला गाणी लिहिण्याची आवड होती. यादरम्यान त्यांनी अनेक गाणी लिहिली, त्यातील एक गाणे त्यांनी गायले 'अदभुत टमटम', जे ऐकून अमिताभ बच्चन देखील भावूक होऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच पारस मणि सिंहच्या आजाराविषयी समजल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याचे आश्वासन दिले. पारस मणि सिंह यांनी सांगितले की, त्यांना तीन मुली आहेत आणि ही पारितोषिक रक्कम ते त्यांच्या अभ्यासासाठी वापरणार आहे.

पारस मणि सिंहची (Paras Mani Singh) बायको अंशु देवी देखील KBC च्या शोवर आली होती. त्यांच्यासाठी अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना प्रत्यक्षात पाहणे ही भाग्याची गोष्ट होती. विजयानंतर अमिताभ बच्चन यांनी पारस मणी सिंह यांच्या पत्नीला स्वतःच्या हाताने सोन्याचे नाणे भेट दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

कार मंदिरात घुसली; ५-६ जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू, पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्या | Chhatrapati Sambhajinagar

The Traitors Winner: उर्फी जावेद आणि निकिता लूथर ठरले 'द ट्रेटर्स'चे विजेते; ट्रॉफीसह मिळाणार कोट्यावधींचे बक्षीस

SCROLL FOR NEXT