Drishyam 2 will be realesed soon
Drishyam 2 will be realesed soon Saam Tv
मनोरंजन बातम्या

Drishyam 2: अजय देवगणचा क्राईम अॅण्ड थ्रिलर चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अजय देवगणचा 'दृश्यम' (Drishyam 2) हा क्राईम-थ्रिलर चित्रपट प्रचंड गाजला होता. मल्याळम चित्रपटाचा रीमेक असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगण आणि तब्बूयांनी त्यांचा आगामी क्राईम थ्रिलर चित्रपट 'दृश्यम २' च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. तसेच या चित्रपटात अक्षय खन्ना, श्रिया सरन आणि इशिता दत्ता यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. दाक्षिणात्या सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता मोहनलालदेखील मुख्य भूमिकेत आहेत. २०१५ साली क्राईम थ्रिलरचा सिक्वेल यावर्षी नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याची महित्ती अजय देवगणने(ajay devgan) त्याच्या ट्वीटर अकाउंटवरून ट्वीट करून त्याच्या चाहत्यांना दिली आहे.

'दृश्यम २' च्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करताना, अजय देवगणने ट्विट करत लिहिले की, "सावधान! 'दृश्यम २' १८ नोव्हेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे." याचबरोबर त्याने तब्बू , अक्षय खन्ना, श्रिया सरन, इशिता दत्ता, विकॉम१८ स्टुडीओ आणि टी-सीरीजला टॅग केले आहे.

'दृश्यम २'च्या प्रदर्शनाचे ट्विट शेअर केल्यानंतर लगेचच अजय देवगणच्या चाहत्यांनी कमेंट करून आनंद व्यक्त केला आहे . एका चाहत्याने लिहिले, 'आम्ही सगळे 'दृश्यम २'ची वाट पाहत आहोत'. दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, 'अरे वाह 'दृश्यम २' लवकरच प्रदर्शित होणार'. अजून एकाने कमेंट केली, 'अखेरीस हा सिनेमा हिंदीमध्ये प्रदर्शित होणार तर'.

'दृश्यम २' या चित्रपटासोबत अजय देवगणचा थॅंक गॅाड हा सिनेमा देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट इंद्र कुमारयांनी दिग्दर्शित केला असून, या चित्रपटामध्ये राकुल प्रीत सिंग आणि सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिका साकारणार आहेत. तसेच अजय देवगणचे मैदान, रेड २ , भोला हे चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाची कारला धडक, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, दोघे जखमी

Marathwada Water Crisis: मराठवाड्यावर भीषण जलसंकट; फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक

Crime News: शिवी दिल्याच्या रागातून भयंकर कांड.. चौघांनी मिळून जिवलग मित्राला संपवलं; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Mother's Day 2024 : एक दिवस फक्त आईसाठी; 'मदर्स डे' ला तुमच्या माऊलीला द्या हे सुंदर सरप्राईझ

Today's Marathi News Live : भाज्यांचे दर कडाडले, किलोमागे तब्बल ८० रुपयांपर्यंत वाढ; अवकाळी पाऊस आणि उष्णतेचा फटका

SCROLL FOR NEXT