Sidharth-Kiara Saam TV
मनोरंजन बातम्या

Sidharth-Kiara Wedding: बाबो! एवढ्या किंमतीचं आहे कियाराचं मंगळसूत्र

कियाराचे मंगळसूत्र सब्यसाची मुखर्जीने डिझाईन केले आहे.

Pooja Dange

Kiara Advani Jewellery: सिद्धार्थ-कियाराच्या लग्नानंतरही सर्वत्र त्यांचीच चर्चा आहे. या नवविवाहित दांपत्याचे सगळीकडे कौतुक होत आहे. ७ फेब्रुवारीला जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसवर कियारा-सिद्धार्थचा शाही विवाहसोहळा पार पडला. जैसलमेरवरून येताना मुंबई विमानतळावर या कपलला पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केलं.

पापाराझींना भेटायला आलेल्या सिड-कियाराने यावेळी मात्र कॅमेरासमोर अनेक पोज दिल्या. तसेच त्यांनी पापाराझींना मिठाई देखील वाटली. यावेळी कियाराने लाल रंगाचा ड्रेस घातला होता. भांगेत सिंदूर, हातात चुडा, गळ्यात मंगळसुत्र आणि अगदी सिंपल लूकमध्ये कियाराच्या चेहऱ्यावर नववधूचे तेज दिसत होते.

नववधूच्या या सौंदर्य मंगळसूत्रामुळे अधिकच खुललं होतं. तसेच साऱ्यांच्या नजर देखील तिच्या मंगळसूत्रावर वेधल्या होत्या. कियाराचे मंगळसूत्र सब्यसाची मुखर्जीने डिझाईन केले आहे. कियाराच्या मंगळसूत्राची किंमत २ करोड आहे. २ करोडचे हे मंगळसूत्र खूप सिंपल आहे. सोन्याची चैन, काळे मणी आणि एक मोठा हिरा तिच्या मंगळसूत्रात आहे.

कियाराच्या लग्नाच्या फोटोमध्ये तिची साखरपुड्यातील अंगठी दिसत आहे. कियाराची अंगठी हिऱ्याची आहे. ओव्हल आकाराची कियाराच्या या अंगठीची किंमत देखील करोडो रुपये आहे. तिच्या अंगठीमध्ये सॉलिटेर आहे. या सॉलिटेर खड्याची किंमतच करोड रुपये आहे. ओव्हल शेपच्या या अंगठीचे वेगळे महत्त्व आहे. अशी अंगठी प्रेम, रोमान्स आणि कमिटमेंटचे प्रतीक आहे.

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नातील लूकचे कौतुक होत आहे. लग्नानंतर काल त्यांनी दिल्लीत रिसेप्शन दिले. आज दोघेही मुंबईत येतील. मुंबईतील सिद्धार्थ मल्होत्राच्या घरी कियारा राहणार आहे. १२ फेब्रुवारीला बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी या जोडप्याने पार्टी ठेवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT