Entertainment News Saam Tv
मनोरंजन बातम्या

'मला पुरुषाची गरज नाही...', अभिनेत्रीने केलं स्वतःशीच लग्न; फोटो शेअर करत दिली माहिती

कनिष्का सोनीने नुकतेच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्यांच्या कपाळावर सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र दिसत आहे.

Shivani Tichkule

मुंबई - बदलत्या काळानुसार लग्न आणि नातेसंबंधांबाबत लोकांची विचारसरणीही बदलत चालली आहे. आधुनिक जगात अनेक मुली एकटे राहणे पसंत करत आहेत. टीव्ही शो 'दिया और बाती हम' फेम कनिष्का सोनीने असाच काहीसा निर्णय घेत स्वतःशी लग्न केले आहे. कनिष्काने फोटो पोस्ट करत याबाबाद माहिती दिली आहे.

कनिष्का सोनीने (Kanishka Soni) नुकतेच तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत, या फोटोमध्ये तिच्या कपाळावर सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र दिसत आहे. कनिष्क सोनीची ही फोटो पाहून तिचे सर्व चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. 'मी स्वतःशी लग्न केले आहे' असे कॅप्शनही तिने आपल्या पोस्टला दिली आहे.

माझी सर्व स्वप्ने स्वतः पूर्ण केली आहेत आणि मी माझ्यावर खूप प्रेम करते. मला कोणत्याही पुरुषाची गरज नाही. मी माझ्या गिटारसह एकटे राहून खूप आनंदी आहे. असे देखील तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त करत तिच्या निर्णयाला धाडसी म्हटले आहे. कनिष्क सोनीने धाडसी पाऊल उचलले आहे असेच म्हणावे लागेल.

कनिष्क सोनी 'दिया और बाती हम', 'पवित्र रिश्ता' आणि 'देवी आदि पराशक्ती' सारख्या अनेक हिट टीव्ही शोमध्ये काम केले आहे. 'दिया और बाती हम', 'पवित्र रिश्ता' या दोन्ही शोने टीव्ही जगतात खळबळ उडवून दिली होती. चाहत्यांना या शोचे वेड लागले होते. अलीकडेच कनिष्का हॉलिवूडमध्ये काम करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या, त्यानंतर तिने टीव्ही इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

SCROLL FOR NEXT