Priyanka Singh Welcome Baby Girl Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priyanka Singh Welcome Baby Girl: 'दीया और बाती हम' फेम अभिनेत्री झाली आई, प्रियंका सिंगच्या घरी लक्ष्मीचं आगमन

Diya Aur Baati Hum Serial: प्रियंकाने १७ दिवसांपूर्वीच म्हणजे ६ सप्टेंबरला गोंडस परीला जन्म दिला.

Priya More

Diya Aur Baati Hum Fame Priyanka Singh:

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) नुकताच आई झाली. दिशाने गोंडस परीला जन्म दिला. आता दिशाच्या पाठोपाठ आणखी एक टीव्ही अभिनेत्री आई झाली आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री प्रियांका सिंगने (Actress Priyanka Singh) मुलीला जन्म दिला. प्रियंकाने १७ दिवसांपूर्वीच म्हणजे ६ सप्टेंबरला गोंडस परीला जन्म दिला. पण तिने नुकताच आपल्या चाहत्यांसोबत आई झाल्याची गोड बातमी शेअर (Priyanka Singh Welcome Baby Girl) केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या सहा वर्षांनंतर प्रियंका सिंग आई झाली आहे. घरी लक्ष्मीचे आगमन झाल्यामुळे प्रियंका आणि तिचे कुटुंबीय खूपच आनंदी आहेत. स्वत: अभिनेत्रीने एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. ती आणि तिचे बाळ सुखरूप आहे. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर अभिनेत्रीचे बेबी बंपसोबत फोटो व्हायरल झाले होते. आता अचानक ती आई झाल्याची माहिती समोर आली. प्रियंका आई झाल्यामुळे तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला असून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

६ सप्टेंबर २०२३ ला देशभरात सर्वजण कृष्णजन्माष्टमीचा उत्साह साजरा करत होते. त्याचवेळी प्रियंकाने गोंडस परीला जन्म दिला होता. प्रियंका सिंग ही भगवान कृष्णाची भक्त आहे. कृष्णजन्माष्टमीलाच मुलीचं तिच्या आयुष्यात येणं हे ती भाग्य समजते. भगवान कृष्णाने हे खास गिफ्ट दिल्याचे तिचं म्हणणं आहे. हा अनुभव खूपच खास असल्याचे मत तिने व्यक्त केले आहे. महत्वाचे म्हणजे प्रियंकाच्या मुलीचा नामकरण विधी देखील पार पडला आहे. तिने आपल्या लाडक्या मुलीचे नाव व्मिका असे ठेवले आहे. पण तिला घरामध्ये राधिका म्हणून बोलवले जाते.

दरम्यान, अभिनेत्री प्रियंका सिंगने 'दिया और बाती हम', 'मेरी भाभी', 'बडी देवरानी', 'संकट मोचन महाबली हनुमान', 'श्रीमद भगवद', 'तेनाली रामन' या प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे. तिने छोट्या पडद्यावर कॉमिकपासून ते सीरिअस अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रियंकाच्या सर्व भूमिकांना चाहत्यांनी चांगली पसंती देखील दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

SCROLL FOR NEXT