Disha Salian's Death Case Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Disha Salian Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; वाढदिवसाच्या दिवशी तिच्या घरी कोण होतं? नव्याने तपास होणार

Disha Salian Death Case Latest News: दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट समोर आले आहे. दिशा सालियन मृत्यूचा तपास आता नव्याने नेमण्यात आलेल्या पोलिसांच्या तपास पथकाने सुरू केला आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे, मुंबई

Disha salian case Update:

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट समोर आले आहे. दिशा सालियन मृत्यूचा तपास आता नव्याने नेमण्यात आलेल्या तपास पथकाने सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन, पोलीस उपायुक्त अजयकुमार बन्सल, मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव हे या प्रकरणाचा तपास करणार आहेत. या प्रकरणात आता काय उलगडा होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास कसा होणार?

दिशा सालियानच्या जन्मदिवशी तिच्या मालाड मालवणी येथील घरी उपस्थित राहिलेल्या सर्वांचे जबाब पुन्हा घेतले जाणार आहेत. याच प्रकरणात काही राजकीय नेत्यांची चौकशी करून जबानी नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आली आहे.

तसेच दिशाच्या वाढदिवसाच्या दिवशी मालाड येथील तिच्या घराजवळ मोबाईल लोकेशन जुळून येत आहेत, अशा सर्व व्यक्तींना पुन्हा एकदा चौकशीला बोलावून त्यांचे जबाब घेतले जाणार असल्याची माहिती हाती आली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंवर भाजपकडून सतत आरोप होत आहेत. आता नव्याने स्थापन झालेल्या एसआयटीकडून आदित्य ठाकरे यांची देखील चौकशी होणार का, याबाबत येत्या काही दिवसातच माहिती समोर येणार आहे. या प्रकरणी इमारतीचे सुरक्षारक्षक, यासोबतच त्या ठिकाणी असणारी नोंदवही किंवा इतर काही तांत्रिक बाबी देखील आता एसआयटीकडून नव्याने तपासल्या जाणार आहेत.

काय आहे प्रकरण?

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने त्याच्या मुंबईतील बांद्रा स्थित घरात आत्महत्या केली. त्याच्या एक आठवड्याआधी मालाडमधील एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. सालियनचा ८ जून २०२० रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसानंतर सुशांत राजपूतने (३४) बांद्रा येथील त्याच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : महाराष्ट्रात घराणेशाहीचा पराभव; महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर PM नरेंद्र मोदी काय म्हणाले?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

SCROLL FOR NEXT