Disha Patani's The first audition video goes viral; netizens think actress underwent a nose job Saam Tv
मनोरंजन बातम्या

Disha Patani's First Audition Video : काय होतीस तू काय झाली तू ? दिशा पाटनीचा पहिला ऑडिशन व्हिडिओ व्हायरल ; अभिनेत्री होतेय तुफान ट्रोल

Disha Patani Viral Video : दिशाच्या पहिल्या ऑडिशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Pooja Dange

Netizens Troll Disha Patani : दिशा पाटनी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. कोणत्याही अभिनयाची पार्श्वभूमी नसलेल्या दिशाने अभिनय क्षेत्रात स्वतः ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिशाच्या पहिल्या ऑडिशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे मात्र नेटकऱ्यांनी दिशाला चांगलच ट्रोल केले आहे.

दिशा ही तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन आणि फिटनेसमुळेही ओळखली जाते. नुकताच दिशाचा वर्कआउटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दिशा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही प्रचंड चर्चेत असते. दिशाने सुशांत सिग राजपूतसोबत 'एम एस धोनी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. दिशाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहे.

दिशा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर दिशाच्या पहिल्या ऑडिशनचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दिशाने वयाच्या १९ वर्षी पहिली ऑडिशन दिली होती. या ऑडिशनला दिशाने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि शॉर्ट पॅन्ट घातली होती. या व्हिडिओत दिशा एका कॉस्मेटिक प्रोडक्टसाठी ऑडिशन देत असल्याच समजत आहे. या व्हिडिओत दिशा खूप वेगळी दिसत आहे.

दिशाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे दिशाला मात्र प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहलयं की, "तुला तर अजुनही अॅक्टिंग येत नाही". अजून एकाने लिहलय की, "प्लॅस्टिक क्वालिटीसोबत काय कमबॅक आहे".

तर दुसर्याने म्हटलयं "वेल डन कॉस्मेटिक सर्जंट". तर काहींनी तिच्या फिगरच कौतुक केलं आहे. एकाने म्हटलयं की, 'तिने नाकाची सर्जरी केली पण...तिची फिगर मॉनी रॉय आणि शिल्पा शेट्टीसारखी आहे'. त्यावर आणखी एका नेटकाऱ्याने कमेंट केली आहे, 'म्हणजे तिने खरच नाकाची सर्जरी केली आहे'. दिशाच्या या व्हिडिओच ट्रोलिंगसोबतच चाहत्यांनी खूप कौतुक केलं आहे.

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर दिशा लवकरच 'योद्धा' या चित्रपटात दिसणार आहे. दिशा खूप दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार असून अधिकृत तारखेची अजून घोषणा करण्यात आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT