Disha Patani  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Disha Patani : दिशा पटानीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा, FIR मध्ये नेमकं काय आहे?

Disha Patani House Firing : दिशा पटानीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. FIR मध्ये नेमकं काय म्हटलं, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करण्यात आला.

गोळीबार प्रकरणी FIR दाखल करण्यात आले.

हल्लेखोरांचा नेमका हेतू जाणून घेऊयात.

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani House Firing ) सध्या चांगली चर्चेत आहे. 12 सप्टेंबरला रात्री दिशा पटानीच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. ही घटना तिच्या उत्तर प्रदेशातील बरेलीतील सिव्हिल लाईन्स येथे घडली. या घटनेने बॉलिवूड पुन्हा हादरले. या प्रकरणात हल्लेखोरांचा तपास पोलीस करत आहेत. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

घडलेल्या हल्ल्याची जबाबदारी रोहित गोदारा गोल्डी ब्रार गँगने घेतली आहे. याप्रकरणी दिशा पटानीच्या वडिलांनी एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरमध्ये नोंदवलेल्या जबाबानुसार, दिशा पटानीचे वडील जगदीश सिंह पटानी म्हणाले की, "हल्लेखोर त्यांना मारण्याच्या उद्देशाने घरात पोहोचले होते. 12 सप्टेंबर रोजी पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर थेट गोळीबार केला. परंतु बाल्कनीच्या खांबाच्या मागे लपून राहून त्यांनी आपला जीव वाचवला."

मीडिया रिपोर्टनुसार, दिशा पटानीच्या घरावर दोन दिवसांत दोनदा हल्ला झाला आहे. अनिरुद्ध आचार्य यांच्या अपमानानंतर दिशा पाटनीच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत आणि हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. पटानी कुटुंबाची सुरक्षा आता वाढवण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, हल्ला करणाऱ्या टोळीने धमकी दिली आहे की, हा फक्त एक ट्रेलर आहे. पुढच्या वेळी ते आणखी धोकादायक गुन्हा करू शकतात. दिशा पटानीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, "प्रत्येकाला त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्यांच्या मुलीचा किंवा बहिणीचा हेतू फक्त महिलांच्या अपमानाचा निषेध करण्याचा होता, परंतु काही लोकांनी ते विकृत केले आणि ते धर्माशी जोडले."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs PAK मॅच फिक्सिंग होती, पराभवानंतर पाक संघावर पैशांचा पाऊस, शिवसेना खासदाराचा गंभीर आरोप

Maharashtra Live News Update: देवव्रत यांनी घेतली महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ

Sangli Crime : बनावट आयकर अधिकाऱ्यांकडून दरोडा; डॉक्टरांच्या घरातून कोट्यवधींचे सोने व रोकड लांबविली

Bhandara Rain : ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, भंडाऱ्यात मुसळधार पाऊस |VIDEO

Pune News : एकीकडे धो धो पाऊस, दुसरीकडे तारामधून ठिणग्या अन् जाळ; मावळमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT