Bohada Film Announcement Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bohada Film Announcement: प्राचीन रुढीची परंपरा आणि नव्याची गुढी बांधायला येतोय मुखवट्यांचा "बोहाडा"...

Chetan Bodke

Bohada Film Announcement

दिग्दर्शक विशाल देवरूखकर मराठी सिनेसृष्टीमध्ये, ‘बॉईज’ चित्रपटामुळे कमालीचे प्रकाशझोतात आले आहेत. कायमच विनोदी आणि वेगवेगळ्या आशयघन चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक सध्या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर दिग्दर्शक विशाल देवरूखकर यांनी "बोहाडा" नावाच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. नुकतंच त्यांनी सोशल मीडियावरून चित्रपटाचा मोशन पोस्टर रिलीज केलेला आहे.

वेगवेगळे मुखवटे धारण करत... माणसाचा खरा चेहरा त्याला दाखवणारा सगळ्यात मोठा देव म्हणजे निसर्ग... आणि ह्या निसर्गाचा गौरव, भारतीय पुराणातील भव्य दिव्य मुखवट्यांना पूजून करायचा उत्सव म्हणजे "बोहाडा". हा चित्रपट २०२४ मध्ये रिलीज होणार नसून पुढच्या वर्षी २०२५ मध्ये त्यांचा "बोहाडा" नावाचा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक विशाल देवरूखकर करीत आहेत. तर दाक्षिणात्य निर्माता मणीगंडन मंजुनाथन "बोहाडा"ची निर्मिती करणार आहेत. राहुल सतिश पाटील, कृतिका तुळसकर देवरूखकर सहनिर्मिती, विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन अंबर विनोद हडप यांनी केले आहे. सध्या तरी चित्रपटातील स्टारकास्ट गुलदस्त्यात आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी सांगितले की, “निसर्गाची आपल्यावर जी कृपा आहे, त्याचे आभार मानण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. खंत या गोष्टीची आहे की, आतापर्यंत हा उत्सव लोकांना माहित नव्हता. हा परंपरागत उत्सव आहे, त्यामुळे या रूढी, परंपरा या चित्रपटातून मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. या चित्रपटाच्या माध्यमातून हा उत्सव लोकांपर्यंत पोहोचेल, अशी आशा आहे. चित्रपटाचे वेगळेपण म्हणजे निसर्गाशी संबंधित असल्याने यात मजा, सस्पेन्स, थ्रिलर यांचे मिश्रण असणार. त्यामुळे प्रेक्षकांना एक जबरदस्त अनुभव येणार आहे. वर्षात ५२ आठवडे असतात, ५२ सोंगेही असतात. जे त्यांचे अस्तित्व दाखवत असतात. परंतु याचा थांगपत्ता आपल्याला नसतो. हेच या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या विषयाचे नाविन्यही अफाट आहे, महाराष्ट्राच्या जंगलात लपलेल्या संस्कृतीवर आधारीत चित्रपट करण्याचा मोह दाक्षिणात्य निर्मात्यांनाही आवरला नाहीये. मराठी सिने दिग्दर्शक म्हणून मला अभिमान वाटतोय की, आपल्या विषयाला दाक्षिणात्य निर्माता पसंती दर्शवत आहेत.”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT