Farhan Akhtar On Casting Ranveer In Don3 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Farhan Akhtar On Ranveer: ‘डॉन ३’च्या कास्टिंगबद्दल दिग्दर्शकाने केला महत्वाचा खुलासा, फरहानने सांगितलं शाहरुख खानला डावलण्याचे कारणं...

Farhan Akhtar News: नुकतंच दिग्दर्शक फरहान अख्तरने ‘डॉन ३’च्या कास्टिंगवर भाष्य केले आहे.

Chetan Bodke

Farhan Akhtar On Casting Ranveer In Don3

लवकरच बॉलिवूडमध्ये डॉनच्या नव्या युगाला सुरूवात होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर दिग्दर्शक फरहान अख्तरने ‘डॉन ३’ची घोषणा केली आणि रणवीर सिंग कमालीचा चर्चेत आला. अनेकदा सोशल मीडियावर ‘डॉन ३’मध्ये शाहरूख खान दिसणार नाही, अशी चर्चा होत होती.

पण ‘डॉन ३’चा टीझर आला आणि शाहरूखच्या चाहत्यांची अपेक्षा भंग झाली. सोशल मीडियावर अनेक युजर्सने, ‘शाहरूख खान नाही तर ‘डॉन ३’नाही’ अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या. नुकतंच दिग्दर्शक फरहान अख्तरने चित्रपटाच्या कास्टिंगवर भाष्य केले आहे.

नुकतंच फरहानने एका मुलाखतीत रणवीरला कास्ट कशाप्रकारे केलं आणि चित्रपटाबद्दल अनेक खुलासे केले आहेत. फरहान खान मुलाखतीत म्हणतो, “मी ‘डॉन ३’साठी खूपच उत्सुक आहे. रणवीर मला या भूमिकेसाठी परफेक्ट अभिनेता वाटतो. ‘डॉन ३’ मधील भूमिकेसाठी रणवीर पूर्णपणे फिट आहे. तो स्वत: या चित्रपटासाठी उत्सुक देखील आहे, आणि नर्व्हस ही आहे. कारण ही भूमिका साकारणे म्हणजे मोठी जबाबदारी आहे.”

तर पुढे फरहान म्हणतो, “ज्यावेळी मी डॉनच्या भूमिकेसाठी शाहरुखची निवड करत होतो, त्यावेळी लोक त्याला म्हणाले की तो अमिताभ बच्चन यांची जागा कसा घेऊ शकतो? रणवीर सिंग या भूमिकेसाठी खूप उत्तम पद्धतीने काम करेल याची मला खात्री आहे. चित्रपटाची कथा आणि चित्रपट माझ्या व्हिजननुसार काम करेल याची मला खात्री आहे.”

सोबतच ज्यावेळी फरहानला एका चांगल्या डॉनच्या भूमिकेसाठी कोणते गुण आवश्यक आहेत? असं विचारलं तर तो म्हणाला, “आत्मविश्वास, एनर्जी, मनापासून काम करण्याची आवड” असं दिग्दर्शकाने उत्तर दिलं. ‘डॉन ३’ जानेवारी २०२५ मध्ये प्रदर्शित होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात कोण कोण भाषण करणार?

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

SCROLL FOR NEXT