Pravin Tarde Shared A Special Post After Watching Subhedar Film Facebook
मनोरंजन बातम्या

Pravin Tarde Watched Subhedar Movie: “सुभेदारांचा सिंहगडावरील पराक्रम…”, प्रवीण तरडेंनी पाहिला खुद्द दिग्पाल लांजेकरांसोबत चित्रपट, अनुभव शेअर करत म्हणाले...

Pravin Tarde News: प्रवीण तरडेंनी ‘सुभेदार’ चित्रपट आपल्या कुटुंबासोबत आणि दिग्पाल लांजेकरांसोबत हा चित्रपट पाहिला आहे.

Chetan Bodke

Pravin Tarde Shared A Special Post After Watching Subhedar Film

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपट गेल्या २५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. तान्हाजी मालुसरेंची यशोगाथा चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार असून प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने दोन आठवड्यात १२.७१ कोटींची कमाई केली आहे. फक्त समीक्षकच नाही तर, सिनेसृष्टीतील कलाकार आणि प्रेक्षकांच्याही पसंदीस हा चित्रपट उतरत आहे. नुकतंच अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. प्रवीण तरडेंनी ‘सुभेदार’ चित्रपट आपल्या कुटुंबासोबतच आणि दिग्पाल लांजेकरनेही हा चित्रपट पाहिला.

आपल्या पोस्टमध्ये दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे म्हणतात, “काल सहकुटुंब सहपरिवार सुभेदारांचा सिंहगडा वरील पराक्रम अनुभवला.. तो सुध्दा लेखक दिग्दर्शक गीतकार दिग्पाल लांजेकर सोबत.. मी आणि पिट्याने सिनेमा आधीच पाहीला होता 1st day 1st show तरी काल पुन्हा पहातानाही शेवटी डोळ्यात पाणी आलेच.. तानाजी रावांची भुमिका काय जबरदस्त साकारलीये अजयने त्याची देहबोली आणि संवादफेक थेट साडेतीनशे वर्ष मागे घेउन जाते.. दिग्पाल मित्रा तु खरच इतिहास जगतोस म्हणुनच तु साकारलेला बहिर्जी खुप सहजसुंदर होता..”

आपल्या पोस्टमध्ये पुढे प्रवीण तरडे म्हणतात, “सिनेमा पाहताना राजदत्त गुरूजी, मंदार परळीकर या शिवभक्तांचा अभिनय सुखावून जातो.. मृणाल कुलकर्णी यांनी वयाचे तीन टप्पे साकारताना बदललेला आवाज आणि देहबोली जिजाऊंचा करारीपणा ठळकपणे उमटवतात..चिन्मय मांडलेकर हा त्याच्या खऱ्या आयुष्यात जितका खरा आणि सात्विक आहे तितकेच खरे आणि सात्विक महाराज तो त्याच्या अभिनयातून जिवंत करतो..”

पोस्टच्या शेवटच्या भागात प्रवीण तरडे म्हणतात, “समीर धर्माधिकारी तु साकारलेला शेलार मामा क्या बात है मित्रा, खुप दिवसांनी दिसलेली स्मिता शेवाळे भाव खावून गेली.. बिपीन सुर्वे, मृण्मयी आणि आस्ताद अप्रतिम..निखिल लांजेकर आणि संगीतकार देवदत्त बाजी तुम्हाला १०० पैकी २०० गुण दिले पाहिजेत. शेवटच्या भैरवीसाठी निवडलेला तुकोबांचा अभंग अफलातून.. अवधूत गांधीच्या आवाजाच्या तर मी प्रेमातच पडलोय.. सुभेदारांचा पराक्रम सहकुटुंब नक्की बघा” (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nilesh Sable: 'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळेविषयी या गोष्टी जाणून व्हाल थक्क!

Accident : मध्यरात्री सोलापूरमध्ये भीषण अपघात, डॉक्टरांचा जागीच मृत्यू, मृतदेह ६ तास कारमध्येच पडून

Maharashtra Live News Update: 'मी ब्राह्मण आहे; इथे ब्राह्मणांचं जास्त चालत नसलं तरी, उत्तर प्रदेशमध्ये चालतं' - नितीन गडकरी

Lakshmi Narayan Yog: 12 वर्षांनंतर शुक्र बनवणार लक्ष्मी नारायण राजयोग; 'या' राशींना होणार धनलाभ

Dam Water Storage : राज्यातील पाणीसंकट मिटले; गतवर्षीच्या तुलनेत धरणात दुपटीने वाढला पाणीसाठा

SCROLL FOR NEXT