Scam 2003 The Telgi Story Release Date Declared Instagram
मनोरंजन बातम्या

Scam 2003: Scoop, Scam 1992 नंतर हंसल मेहताची आणखी एक वेबसीरिज येणार, प्रदर्शनाची तारीख जाहीर

Scam 2003 The Telgi Story: ‘स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी’ नंतर हंसल मेहता यांची ‘स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Chetan Bodke

Scam 2003 The Telgi Story Release Date Declared: हंसल मेहता दिग्दर्शित ‘स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी’ प्रदर्शित होताच वेबसीरिज तुफान गाजली होती. या सीरिजमध्ये प्रतिक गांधीने प्रमुख भूमिका साकारली होती. आता हंसल मेहता यांनी आपल्या नव्या कलाकृतीची घोषणा केली आहे. तब्बल तीन वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर त्यांची आगामी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. ‘स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सोनी लिव्हने डिजिटल प्लॅटफॉर्म विश्वात यशस्वी तीन वर्षे पूर्ण केली आहेत. या प्रसंगी सोनी लिव्हने इंस्टाग्रामवर एक मोशन पोस्टर व्हिडिओ शेअर करून ‘स्कॅम 2003’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ‘सोनी लिव्ह’च्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर या वेब सीरिज चा मोशन पोस्टर शेअर केला आहे. निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘द तेलगी स्टोरी’ हा हंसल मेहताच्या 2020 च्या हिट ‘स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी’ चा फॉलोअप आहे. ‘स्कॅम 2023: द तेलगी स्टोरी’ येत्या २ सप्टेंबरपासून सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.

पत्रकार संजय सिंह यांनी लिहिलेल्या ‘रिपोर्टर की डायरी’ या पुस्तकातून वेब सीरीजची कथा घेण्यात आली आहे. हंसल मेहता यांनी अलीकडेच नेटफ्लिक्स क्राईम ड्रामा मालिका ‘स्कूप’ ची सहनिर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. याआधी त्यांनी ‘फराज’ हा होस्टेज थ्रिलर चित्रपट दिग्दर्शित केला होता.

काही दिवसांपूर्वी सीरिजच्या निर्मात्यांवर काही कारणास्तव कायदेशीर कारवाई झाली होती. त्यामुळे ती सीरिज बरीच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. तेलगीच्या कुटुंबीयांनी केलेल्या केसमुळे ही सीरिज चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर आता या वेबसीरिजबद्दल एक नवी अपडेट समोर आली आहे. निर्मात्यांनी सर्व वादांना सामोरे जात अखेर या वेबसीरिजच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

२ सप्टेंबर २०२३ ला ही वेबसीरिज ‘सोनी लीव्ह’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अभिनेता गगन देव या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार असून या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा हंसल मेहता यांच्याकडे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

SCROLL FOR NEXT