Dilip Prabhavalkar Dashavatar Saam tv
मनोरंजन बातम्या

Dilip Prabhavalkar: वयाच्या ८१ व्या वर्षी दिलीप प्रभावळकरांचे दमदार ॲक्शन सीन; 'दशावतार'मध्ये साकारली तब्बल ११ पात्र

Dilip Prabhavalkar Dashavatar: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि अष्टपैलू अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची आणि जिद्दीची छाप पाडली आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी अनेक ॲक्शन सीन्स स्वतः केले आहेत.

Shruti Vilas Kadam

Dilip Prabhavalkar Dashavatar: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि अष्टपैलू अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची आणि जिद्दीची छाप पाडली आहे. येत्या १२ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘दशावतार’ या बहुचर्चित चित्रपटात त्यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी अनेक ॲक्शन सीन्स स्वतः केले आहेत. एवढंच नाही, तर त्यांनी अंडरवॉटर सीनदेखील स्वतः केले आहेत असं समजतंय.

दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी त्यांच्या वयाचा विचार करून बॉडी डबल ठेवण्याची तयारी केली होती. सेटवर बॉडी डबल सदैव उपस्थितही होते. मात्र प्रभावळकरांनी ‘ॲक्शन सीन्स नैसर्गिक वाटावेत’ म्हणून ते मीच करणार’, असं ठाम सांगितलं आणि ते प्रत्यक्षात करूनही दाखवलं.

अरण्यातील धावपळीचे प्रसंग, नदीतील पोहण्याचे प्रसंग, अंडरवॉटर शूटींग ते अगदी साहस दृश्यं सुद्धा त्यांनी स्वतः साकारली आहेत. या चित्रपटाचं चित्रीकरण कोकणातील गर्द जंगलं, तलाव आणि दुर्गम ठिकाणी करण्यात आलं आहे. विविध प्रकारच्या वेशभूषा, आव्हानात्मक लोकेशन्स आणि नुकताच होऊन गेलेला चिकनगुनिया सारखा वेदनादायी आजार या साऱ्या अडथळ्यांवर मात करत दुर्दम्य इच्छाशक्ती आणि भूमिकेला, कथेला न्याय देण्याची प्रामाणिकता यामुळेच दिलीप प्रभावळकर यांनी हे सर्व सक्षमपणे पार पाडले आहे.

आपला अनुभव सांगताना दिलीप प्रभावळकर म्हणाले, ‘’’दशावतार’ ची संकल्पना आणि स्क्रिप्ट मला खूप आवडली कारण ही व्यक्तिरेखा आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी होती. मी ती कशी पेलेन याबाबत माझ्यापेक्षा लेखक दिग्दर्शक सुबोध खानोलकरला जास्त विश्वास वाटला होता. आजवरच्या माझ्या सगळ्या महत्त्वपूर्ण भूमिकांबाबत मी हेच म्हणतो की माझ्या दिग्दर्शकांना ती ती पात्रं माझ्यात दिसली. मग त्या भूमिकांना सजीव रूप देणं ही माझी जबाबदारी ठरते. ‘दशावतार’ मधील बाबुली हे पात्र विभिन्न छटा असलेलं पात्र होतं... एक कलावंत, एक बाप आणि बरंच काही. त्यामुळे मला हे जबरदस्त आव्हान वाटलं. ॲक्शन सीन्स करताना थोडी भीती होती परंतु सुबोध सारख्या नव्या दिग्दर्शकाकडून बरंच नवं काही शिकता आलं. या वयात असा अनुभव घेणं हे एक वेगळं थ्रील होतं. त्यामुळे ‘दशावतार ‘ मधील भूमिका ही माझ्यासाठी अनोखी सफर आणि अविस्मरणीय आठवण आहे.’’

‘झी स्टुडिओज’ प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी, ओशन आर्ट हाऊस निर्मित या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलं आहे. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्यासह महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांच्याही भूमिका महत्त्वाच्या ठरणार आहेत.

गुरु ठाकूर यांनी संवाद आणि गीतलेखन केले असून, ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिलं आहे. सुजय हांडे, अशोक हांडे, ओंकार काटे, आदित्य जोशी, नितीन सहस्रबुद्धे, मृणाल सहस्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर अजित भुरे हे सृजनात्मक निर्माते आहेत. झी स्टुडीयोजचे उमेश बन्सल आणि बवेश जानवलेकर हा ‘दशावतार’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: घराजवळच्या तलावात आढळला काँग्रेस नेत्याचा मृतदेह, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update: ड्रोन लाईट शोद्वारे पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छांनी उजळणार पुण्याचे आकाश

Hingoli Rain: हिंगोलीत मुसळधार पावसामुळे हळद पिक पाण्याखाली; बळीराजा संकटात|VIDEO

Hingoli Heavy Rain : हिंगोलीत तुफान पाऊस; रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक बंद, बाजार समितीतही नुकसान

Kolhapur Madhuri Elephant : माधुरी हत्तीण पुन्हा कोल्हापुरात येणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT