Panchak Title Song Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Panchak Title Song Out: 'पंचक'चे टायटल साँग आऊट, भीतीची बाराखडी एकदा बघाच

Madhuri Dixit Panchak Movie: काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली. आता या चित्रपटाचे टायटल साँग प्रदर्शित झाले आहे.

Priya More

Panchak Movie:

पाच नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला पंचक म्हटले जाते. यात शुभ-अशुभ घडले की ते पाच पटीने वाढते. याच संकल्पनेवर आधारित असलेला 'पंचक' चित्रपट (Panchak Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी निर्मिती केलेला 'पंचक' पुढच्या वर्षी म्हणजेच ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली. आता या चित्रपटाचे टायटल साँग प्रदर्शित झाले आहे.

नुकताच प्रदर्शित झालेल्या पंचकचे टायटल साँग खूपच जबरदस्त आहे. एकम… द्वितीय… तृतीय… अशी आगळी-वेगळी सुरूवात असणारे हे गंमतीशीर गाणे सुहास सावंत यांनी गायले आहे. गुरू ठाकूर यांचे शब्द लाभलेल्या या गाण्याला मंगेश धाकडे यांनी संगीत दिले आहे. हे गाणं ऐकायला जितकं जबरदस्त आहे तितकंच ते पाहायला देखील धमाल आणि मजेदार आहे.

पंचक चित्रपटामध्ये आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर आणि गणेश मयेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत.

माधुरी दीक्षितने निर्मिती केलेल्या पंचकच्या टायटल साँगमध्ये दिसत आहे की, चार कलाकार शेतामधून एकापाठोपाठ धावत आहेत. त्यांच्या मागे पाचवा कुत्रा धावत आहे. गाण्याच्या शेवटपर्यंत हे कलाकार धावतच राहतात असे दिसत आहे. कधी गावातून तर कधी शेतामधून हे कलाकार पळत सुटले आहेत. 'या गाण्याचे चित्रीकरण सलग दोन दिवस चालले. दोन दिवस हे कलाकार संपूर्ण गावभर पळत होते.', असे दिग्दर्शक राहुल आवटे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT