Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Saam Tv
मनोरंजन बातम्या

TMKOC : आता तारक मेहता का उल्टा चष्मामधून जेठालालही गायब, होणार लवकरच रिप्लेस ?

दिलीप जोशी म्हणजे प्रेक्षकांचा लाडका जेठालाल या काही एपिसोडमध्ये अनुपस्थित राहिल्याने चाहते खूपच घाबरले आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : टीव्ही वरील प्रसिद्ध विनिडी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) सध्या खूप चर्चेत आहे. कधी ही मालिका सोडणाऱ्या जुन्या पात्रांबद्दल तर कधी या मालिकेमध्ये येणाऱ्या नवीन कलाकारांच्या प्रवेशामुळे हा कार्यक्रम प्रकशझोतात असतो. नुकतेच तारक मेहताच्या भूमिकेत दिसणारा शैलेश लोढाने या मालिकेचा निरोप घेतला. त्यानंतर बऱ्याच गोष्टी उघडकीस आल्या, आता तारक मेहता व्यक्तिरेखेसाठी नवा चेहरा सापडल्याने हा शो पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.

तारक मेहताच्या भूमिकेत सचिन श्रॉफला कास्ट करण्यात आले आहे. लवकरच शोमध्ये त्याची एन्ट्री होणार आहे. मात्र यासोबतच आता दिलीप जोशी(Dilip Joshi) म्हणजे प्रेक्षकांचा लाडका जेठालाल या काही एपिसोडमध्ये अनुपस्थित राहिल्याने चाहते खूपच घाबरले असून, कदाचित दिलीप जोशीही या शोला अलविदा करणार असल्याचे प्रेक्षकांना वाटत आहे.

इतके दिवस जेठालालचे पात्र शोमध्ये न दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. सहसा शोचे सर्व भाग जेठालालभोवती फिरत असतात परंतु सध्या हे पात्र बरेच दिवस अनुपस्थित आहे. जेठालाल अमेरिकेला गेल्याचे दाखवण्यात आले आणि तेव्हापासून तो शोमध्ये परतलाच नाही. तसेच जेठालालची एकही झलक दिसली नाही, त्यामुळे आता दिलीप जोशीही शो सोडणार असल्याची भीती चाहत्यांना लागली आहे.

त्याचवेळी चाहत्यांना या भीतीने हैराण होऊन या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना इशाराही दिला आहे. 'कोणीही बदलले तरी जेठालालच्या भूमिकेत दिलीप जोशीच्या ऐवजी कोणीही दुसरा कलाकार आणू नये', असे युजर्स सोशल मीडियावर लिहित आहेत. या भूमिकेत त्याला फक्त दिलीप जोशीलाच बघायचे आहेत. त्याच वेळी, काही यूजर्सनी लिहिले की हळूहळू शोची जुनी टीम बदलली जात आहे त्यामुळे शो बघण्याची इच्छा पण कमी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अकोल्यात बकरीला वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडुन मृत्यू

Kishor Kadam : किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात; सरकारला केली विनंती, नेमकं प्रकरण काय?

दुहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलं, भाजप नेत्याची कार्यलयातच हत्या, भिवंडीत रात्री ११ वाजता काय घडलं?

खोटं धर्मांतरण करून दुसरं लग्न, पोलीस कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ; धुळ्यात खळबळ

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ऑगस्टचा हप्ता कधी येणार? संभाव्य तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT