'धुरंधर' 5 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.
'धुरंधर' चित्रपटातल्या रणवीर सिंहच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
'धुरंधर' ने दोन दिवसांत हाफ सेंच्युरी पूर्ण केली आहे.
रणवीर सिंहचा 'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. 'धुरंधर' चित्रपट आदित्य धर याचा आहे. कंधार अपहरण आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांसह अनेक सत्य घटनांपासून चित्रपट प्रेरित आहे. 'धुरंधर' चित्रपटात रणवीर सिंहसोबत संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, आर माधवन, राकेश बेदी हे तगडे कलाकार झळकले आहेत. चित्रपटाची दोन दिवसांची कमाई जाणून घेऊयात.
रणवीर सिंहच्या 'धुरंधर' या ॲक्शन चित्रपटाने ओपनिंग डे पासून बक्कळ कमाई करायला सुरुवात केली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी शुक्रवारी तब्बल 27 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर रिलीजच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार,'धुरंधर' ने 31 कोटी रुपये कमावले आहे. दोन दिवसांत सिनेमाने एकूण 58 कोटींची कमाई केली आहे. दोन दिवसांत चित्रपटाने हाफ सेंच्युरी केली आहे. चित्रपट वीकेंडला 100 कोटींचा व्यवसाय करणार असल्याचे दिसत आहे.
पहिला दिवस - 27 कोटी रुपये
दुसरा दिवस - 31 कोटी रुपये
एकूण - 58 कोटी रुपये
Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार, 'धुरंधर'ने शनिवारी बॉक्स ऑफिसवर अंदाजे 69.75 कोटी रुपये कमावले. परदेशात, 'धुरंधर'ने अंदाजे 7.6 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. ज्यामुळे जगभरातील एकूण कमाई अंदाजे 77.35 कोटी रुपये झाली. जर चित्रपटाने ह्याच गतीने कमाई केली तर लवकरच जगभरात 'धुरंधर' 100 कोटींचा टप्पा पार करेल.
मीडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर' अंदाजे 280 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट आहे. 'धुरंधर'च्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होत राहिली, तर चित्रपट दोन आठवड्यात आपले बजेट वसूल करेल.
मीडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर' संजय दत्तचा 6 वा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.धुरंधरने संजय दत्तच्या बागी ४ , डबल धमाल, ऑल द बेस्ट आणि शमशेरा या चित्रपटांना मागे टाकले आहे. धुरंधरने रणवीर सिंगच्या 'सर्कस'च्या आयुष्यभराच्या कलेक्शनला मागे टाकले आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सर्कस'ने ₹35.80 कोटी कमावले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.