Dhurandhar 2 saam tv
मनोरंजन बातम्या

Dhurandhar 2 : 'धुरंधर 2'चा बॉक्स ऑफिसवर धमाका; पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई, नोटा मोजताना हात दुखतील, वाचा कलेक्शन

Dhurandhar The Revenge Opening Day Collection : रणवीर सिंहच्या 'धुरंधर 2'ने पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन, जाणून घेऊयात. 'धुरंधर 2'साठी थिएटर हाऊसफुल आहेत.

Shreya Maskar

'धुरंधर 2' चित्रपट 19 मार्च 2026ला रिलीज झाला.

'धुरंधर 2'ने पहिल्याच दिवशी शाहरुख खानला मागे टाकले आहे.

रणवीर सिंहची मुख्य भूमिकेत असलेल्या या स्पाय-थ्रिलर चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर 2' म्हणजेच 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. 'धुरंधर 2' चित्रपट 19 मार्च 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटत बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसत आहे. 'धुरंधर 2' हा एक जबरदस्त ॲक्शन चित्रपट असून यात रहमान डकैतच्या मृत्यूनंतर पुढे काय घडते, हे दाखवण्यात आले आहे. ही कथा भारताचा गुप्तहेर असलेल्या आणि पूर्वी 'जसकीरत सिंह रंगी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हमझा अली माझारीच्या प्रवासाची आहे.

'धुरंधर: द रिव्हेंज' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 1

'धुरंधर 2' ने पहिल्या दिवशी 100 कोटींहून अधिक कमाई केली आणि देशांतर्गत बाजारपेठेत एकूण कमाई १५० कोटींच्या घरात गेली आहे. 'धुरंधर 2' प्रदर्शनापूर्वी, निर्मात्यांनी 18 मार्च 2026 रोजी विशेष 'पेड प्रिव्ह्यू' शो आयोजित केले होते. तांत्रिक अडचणींमुळे देशभरात अनेक शो उशिरा सुरू झाले किंवा काही तर रद्दही झाले. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'धुरंधर 2' चित्रपटाने केवळ या प्रिव्ह्यू शोमधूनच 43 कोटी रुपयांची कमाई केली.

'धुरंधर 2'च्या प्रिव्ह्यू शोनंतर शुक्रवारी म्हणजेच रिलीजच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. चित्रपटाने भारतात 102.55 कोटी रुपयांची (net) कमाई केली. यात 59.5% ची लक्षणीय वाढ दिसून आली. यामुळे, देशांतर्गत बाजारपेठेत चित्रपटाची एकूण कमाई सध्या 145.55 कोटी रुपये झाली. तसेच 172.63 कोटी रुपये (एकूण/gross) इतकी झाली आहे.

'धुरंधर 2'ने भाषेनुसार, हिंदी भाषेत 19,500 शोद्वारे चित्रपटाने 99.10 कोटी रुपये, तर कन्नड भाषेत 62 शोद्वारे 0.08 कोटी रुपये कमावले. मल्याळम भाषेत 96 शोद्वारे 0.09 कोटी रुपयांची भर पडली. तमिळ भाषेत 958 शोद्वारे 1.16कोटी रुपयांची कमाई झाली आणि शेवटी तेलुगू भाषेत 1,112 शोद्वारे 2.12 कोटी रुपयांची कमाई झाली. आता वीकेंडला 'धुरंधर 2' किती कमावणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

धुरंधर

'धुरंधर' 5 डिसेंबर 2025 रिलीज झाला होता. रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या या स्पाय-थ्रिलरला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. 'धुरंधर' चित्रपटात रणवीर सिंगसोबत सारा अर्जुन, सारा अर्जुन, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना हे कलाकार झळकले. या चित्रपटात अक्षय खन्नाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.

शाहरुख खानला टाकले मागे

2023 साली शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाने पहिल्याच दिवशी 75 कोटी कमावले होते. तर जगभरात (Gross) 129.6 ची कमाई केली होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी 'धुरंधर 2'ने 'जवान' ला मागे टाकले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : तब्बल १०४ टन सोनं भारतात आलं, भारतातील सोन्याच्या किंमती कमी होणार? वाचा

Maharashtra News Live Update: रायगड जिल्ह्यातील वाहतूक कोंडीची परिस्थिती कायम

Crime News : अहिल्यानगर हादरलं! किरकोळ वाद टोकाला गेला, मुलाने वडिलांवर चाकूने वार करत संपवलं

Plane Crash : खेळाडूंना घेऊन जाणारे विमान झाडांवर कोसळले; ५ जणांचा मृत्यू

Riteish- Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी' १ नंबर ! रितेशच्या चित्रपटाने 'सैराट'लाही पछाडलं, रेकॉर्ड ब्रेक करत कमावले तब्बल 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT