Dhurandhar 2 Collection saam tv
मनोरंजन बातम्या

Dhurandhar 2 Collection : जगभरात 'धुरंधर 2'चा धुमाकूळ; 1,400 कोटींच्या उंबरठ्यावर, रणवीर सिंहने रचला इतिहास

Dhurandhar The Revenge Box Office Collection Day 12 : रणवीर सिंहचा 'धुरंधर 2' जगभरात धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने १ आठवड्यात बक्कळ कमाई केली आहे. एकूण कलेक्शन वाचा.

Shreya Maskar

'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट 19 मार्च 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट आदित्य धर दिग्दर्शित आहे.

'धुरंधर २' ने जगभरात लवकरच 1400 कोटी रुपये कमावेल.

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' स्पाय थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची सर्वत्र हवा पाहायला मिळत आहे. चित्रपटाने १ आठवड्यात बक्कळ कमाई केली आहे. सर्वत्र रणवीर सिंहच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. चित्रपटाची दुसऱ्या सोमवारची कमाई पाहा.

'धुरंधर 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 12

'धुरंधर 2' भारतातील निव्वळ कमाईचा आकडा ८०० कोटी रुपयांच्या वर आणि जगभरातील एकूण (gross) कमाई १३०० कोटी रुपयांच्या वर पोहोचला. 'धुरंधर: द रिव्हेंज'ची जगभरातील एकूण बॉक्स ऑफिस कमाई १४०० कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याच्या अगदी उंबरठ्यावर आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर 2'ने दुसऱ्या सोमवारी १७,६१४ शोजमधून २५.३० कोटी रुपयांची कमाई केली. आदल्या दिवशीच्या ६८.१० कोटी रुपयांच्या निव्वळ कमाईच्या तुलनेत चित्रपटाच्या कमाईत ६२.८% ची घट झाली. आता 'धुरंधर २'ची भारतातील एकूण निव्वळ कमाई ८७२.१७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जगभरात आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय थ्रिलरने १,३९२.२३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये भारतातील १,०४२.२३ कोटी रुपयांच्या एकूण (gross) कमाईचा आणि परदेशातील ३५०.०० कोटी रुपयांच्या व्यवसायाचा समावेश आहे.

'धुरंधर २' हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. आतापर्यंत हिंदी भाषेत सर्वाधिक कमाई झाली आहे. हिंदीमध्ये १२ व्या दिवशी २३.५० कोटी रुपये, कन्नडमध्ये ०.२० कोटी रुपये, मल्याळममध्ये ०.१० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तर तमिळ आणि तेलुगू भाषांमधील अनुक्रमे ०.३५ कोटी रुपये आणि १.१५ कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे.

'धुरंधर २' हा रणवीर सिंगचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

'धुरंधर २' ने 'धुरंधर' चित्रपटाच्या कामगिरीलाही मागे टाकले आहे. २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर' या चित्रपटाची भारतातील एकूण बॉक्स ऑफिस कमाई ८४०.२० कोटी रुपये (नेट) आणि १,००७.८५ कोटी रुपये (ग्रॉस) इतकी होती. शिवाय, या पहिल्या चित्रपटाची जगभरातील एकूण (ग्रॉस) कमाई १,३०७.३५ कोटी रुपये इतकी होती.

रणवीर सिंगचे टॉप ५ चित्रपट

  • 'धुरंधर: द रिव्हेंज' - ८७२.१७ कोटी रुपये

  • 'धुरंधर' - ८४०.२० कोटी रुपये

  • 'पद्मावत' - ३०२.१५ कोटी रुपये

  • 'सिंघम अगेन' - २४७.८६ कोटी रुपये

  • 'सिम्बा' - २४०.३० कोटी रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना बसला मोठा धक्का! एकाच झटक्यात भाव गगनाला भिडले, काय आहेत नवे दर?

Maharashtra News Live Update: ....अन्यथा मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांचा व शासकीय वाहनांचा लिलाव करणार- रविकांत तुपकर

Cardamom Benefits : सलग १५ दिवस वेलची खाल्ल्याने शरीरात होतील 'हे' ६ महत्त्वाचे बदल

Career Horoscope : आजपासून ‘या’ ५ राशींचं नशीब पालटणार! कामाचा ताण होईल कमी अन् पैशांचा पाऊस पडणार

Earphone side effects: इअरबड्स काढल्यानंतरही कानात शिट्टीसारखा आवाज ऐकू येतोय? शरीराचा हा इशारा अजिबात दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT