dhoom fame actress rimmi sen fraud by businessman for 4.14 crore, khar police filer FIR Saam TV
मनोरंजन बातम्या

Rimmi Sen: 'धूम' फेम अभिनेत्री रिमी सेनला सव्वा चार कोटींचा गंडा

Rimmi Sen Latest News: ठरलेल्या अवधीत व्यासने अभिनेत्रीला पैसे परत केले नाहीत. तिने पैशांची मागणी केली असता तो विविध कारणे देऊ लागला.

सुरज सावंत

मुंबई: अभिनेत्री रिमी सेनची (Rimmi Sen) सुमारे सव्वा चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोरेगाव (Goregaon) येथील एका व्यावसायिकाविरोधात खार पोलिसांकडे (Khar Police) तक्रार केली आहे. २०१९ मध्ये अंधेरी येथील व्यायामशाळेत रोनक जतीन व्यास (Ronak Jatin Vyas) या आरोपी व्यावसायिकाशी तिची ओळख झाली होती. व्यावसायिकाने तिमाही ३० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवल्यामुळे रिमी सेनने तिच्या चित्रपट निर्मिती कंपनीच्या माध्यमातून चार कोटी १४ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. नफा किंवा तिने गुंतवलेली मूळ रक्कमही तिला मिळाली नाही. तसेच व्यावसायिकाने संपर्क तोडल्याने आपली फसवणूक (Fraud) झाल्याप्रकरणी रिमीने खार पोलीसात तक्रार (Case) नोंदवली आहे. या प्रकरणी खार पोलिस (Khar Police) आरोपीचा शोध घेत आहेत. (dhoom fame actress rimmi sen fraud by businessman for 4.14 crore, khar police filer FIR)

हे देखील पहा -

रिमी सेनने ‘धूम’, ‘गोलमाल’, ‘हंगामा’, ‘बागबान’, ‘फिर हेरा फेरी’ सारख्या चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केलं आहे. अंधेरी येथील रहिवासी असलेल्या अभिनेत्री रिमीने शुभमित्र स्वपनकुमार सेन या तिच्या खऱ्या नावाने तक्रार केली आहे. आरोपी रोनक व्यास हा मूळचा गुजरातमधील अहमदाबाद येथील रहिवासी असून सध्या गोरेगाव येथील नास्को गार्डन परिसरात राहतो. गुजरातमध्ये त्याची ‘फोमिंगो बेव्हरेज’ नावाची कंपनी आहे. ही कंपनी कमोडिटी व्यवसायात गुंतवणूकीचा व्यवसाय करते, असे सांगितले होते.

आरोपी व्यासने रिमी सेनचा विश्वास संपादन करण्यासाठी अभिनेत्रीला सुरक्षेची हमी म्हणून साडे तीन कोटी रुपयांचा धनादेश आगाऊ दिल्याचे पोलिसांनी सांगितले. रिमीने फेब्रुवारी ते जुलै २०१९ दरम्यान व्यास यांच्या कंपनीच्या बँक खात्यात एकूण एक कोटी रुपये हस्तांतरीत केले. ही रक्कम मिळाल्यानंतर व्यास याने अभिनेत्रीला तिच्या गुंतवणुकीवर ४० टक्के परतावा देण्याचे वचन दिले होते. यानंतर अभिनेत्रीने ऑक्टोबर २०१९ ते नोव्हेंबर २०२० दरम्यान तीन कोटी १४ लाख रुपये रुपये हस्तांतरित केले. अशा प्रकारे तिने एकूण चार कोटी १४ लाख रुपये व्यासच्या व्यवसायात गुंतवले.

ठरलेल्या अवधीत व्यासने अभिनेत्रीला पैसे परत केले नाहीत. तिने पैशांची मागणी केली असता तो विविध कारणे देऊ लागला. मार्च २०२० मध्ये अभिनेत्रीने व्यास यांच्याकडे तिच्या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर, त्याने अभिनेत्रीच्या कंपनीच्या खात्यात तीन लाख रुपये हस्तांतरीत केले. पैसे परत न मिळाल्याने नाराज झालेल्या अभिनेत्रीने व्यास याने दिलेला चेक बॅंकेत टाकला असता संबधित खाते हे यापूर्वीच बंद केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खार पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० आणि ४०९ भा.द.वी अंतर्गत रोनक व्यास विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricketer Accident: वेस्टइंडीजच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात! कारचा झालाय चुराडा

Pune Politics: मतदानापूर्वीच पुण्यात मनसेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांनी 'तुतारी' घेतली हाती

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

SCROLL FOR NEXT