Dhondi Champya Marathi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dhondi Champya: भरत जाधव आणि वैभव मांगले घेऊन येत आहेत रेडा आणि म्हशीची अनोखी प्रेमकथा

धोंडी आणि चंप्या यांचे प्रेम सफल होण्यासाठी त्यांचे मालक त्यांना मदत करणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Marathi Movie: मराठी चित्रपट सृष्टीत वेगवेगळे विषय आणि आशय घेऊन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. असाच एक चित्रपट सध्या सोशल मीडियावर जाहीर करण्यात आला आहे. रेडा आणि म्हशीची अनोखी प्रेमकथा असलेला 'धोंडी चंप्या' हा चित्रपट १६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रिलायन्स एंटरटेनमेंट आणि सुनील जैन प्रस्तुत ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये एक आगळीवेगळी प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. प्रभाकर भोगले यांच्या कथेद्वारा प्रेरित होऊन बनवलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांनी लिहले आहेत.

भरत जाधव, वैभव मांगले हे विनोदाचे दोन बादशाह या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. यांच्यासह सायली पाटील आणि निखिल चव्हाण हे सुद्धा मुख्य भूमिकेत साकारणार आहेत. (Marathi Movie)

पोस्टरमध्ये धोंडी आणि चंप्या दिसत आहेत. या दोघांमध्ये फुलणारी प्रेमकथा आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच सायली आणि निखिल याची काय व्यक्तिरेखा असे याचीही सर्वांना उत्सुकता लागली आहे. पोस्टरवरून तरी हा एक धमाल विनोदी चित्रपट असल्याचे लक्षात येत आहे. (Comedy)

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर यांनी म्हटले आहे की, ''सर्व वयोगटांसाठी असलेला हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. धोंडी आणि चंप्या यांचे प्रेम सफल होण्यासाठी त्यांचे मालक त्यांना मदत करणार की, त्यांच्या प्रेमकथेत आणखी काही ट्विस्ट येणार, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.''

या चित्रपटातील गाण्यांना सौरभ दुर्गेश यांनी संगीत दिले आहे. गुरु ठाकूर, मंदार चोळकर, गणेश निगडे यांनी या चित्रपटाची ही गाणी लिहिली आहेत. या गाण्यांना अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, सनाह मोईडुट्टी, सौरभ शेट्ये यांनी गायले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT