मनोरंजन बातम्या

Dhondi Champya - Ek Prem Katha: धोंडी-चंप्यासह फुलणार ओवी- आदित्यची प्रेमकहाणी, चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

धोंडी चंप्या या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Dhondi Champya-Ek Prem Katha Teaser Out: 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ हे एका मराठी चित्रपटाचे नाव आहे. हे नाव ऐकूनच आपल्याला हे लक्षात येत की हा एक विनोदी चित्रपट आहे. धोंडी चंप्या या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. एक आगळीवेगळी प्रेमकहाणी असणाऱ्या या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, सायली पाटील, निखिल चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत सुनील जैन आणि कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ चित्रपटाचे दिग्दर्शन ज्ञानेश भालेकर आहे. प्रभाकर भोगले यांच्या कथेने प्रेरित होऊन 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ची निर्मिती करण्यात आलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांनी लिहिले आहेत.

ही प्रेमकथा धोंडी आणि चंप्याची आहे, हे आपल्याला यापूर्वीच कळले आहे. आता या प्रेमकहाणीत आणखी एक प्रेमकहाणी बहरत आहे ती म्हणजे सायली आणि निखिलची म्हणजेच ओवी आणि आदित्यची. या सगळ्यांच्या प्रेमाच्या आड येत आहेत, अंकुश आणि उमाजी. टीझरमध्ये या दोघांमध्येही अनेक खटके उडताना दिसत आहेत. त्यामुळे आता धोंडी -चंप्या आणि ओवी- आदित्यची यांचे प्रेम यशस्वी होणार का, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला १६ डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. (Movie)

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर म्हणतात, " हा एक विनोदी चित्रपट असून यात भरत जाधव, वैभव मांगले यांच्यासारखे जबरदस्त कलाकार आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना भरपूर हसवार आहे. एकाच गावातील दोन व्यक्तींमध्ये वैमनस्य असताना त्यांच्या मुलांमध्ये आणि जनावरांमध्ये जेव्हा प्रेमाचे सुत जुळू लागते, तेव्हा होणारी धमाल यात आपल्याला पाहायला मिळणार आहे.'' (Comedy)

'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा' या चित्रपटाचे सुनील जैन, आदित्य जोशी, व्हेनिसा रॉय, आदित्य शास्त्री हे निर्माते असून अमित अवस्थी, सुशांत वेंगुर्लेकर हे सहनिर्माते आहेत. (Celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरन्यायाधीश भूषण गवईंविरुद्ध आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Police Constable Bharti: धक्कादायक! ७,५०० कॉन्स्टेबल पदासाठी १०,००,००० अर्ज; पीएचडी, इंजिनियर अन् पदवीधारकांकडून प्रयत्न

सांगलीत अजित पवारांचा नेता मोठा निर्णय घेणार, पक्षविरहित स्थानिक निवडणूक लढवणार

Dharashiv : गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेले; परराज्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषद सदस्य पदाकरिता आरक्षण सोडतीची तारीख ठरली, कधी आणि कुठे होणार कार्यक्रम?

SCROLL FOR NEXT