Dharmendra SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dharmendra : "धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर"; सनी देओलच्या टीमने दिलं अपडेट

Sunny Deol Give Dharmendra Health Update : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे रुग्णालयात दाखल आहेत. सनी देओलच्या टीमने धर्मेंद्र यांचे हेल्थ अपडेट दिले आहेत. त्यांची प्रकृती कशी आहे, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धर्मेंद्र यांचे हेल्थ अपडेट सनी देओलच्या टीमने दिले आहेत.

धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

89 वर्षांचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra ) सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोले जात आहे. त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धर्मेंद्र हे व्हेंटिलेटरवर असल्याची बातमी समोर येत आहे. मात्र आता सनी देओलच्या टीमने धर्मेंद्र यांचे हेल्थ अपडेट शेअर केले आहे. बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलने आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. ज्यात धर्मेंद्र यांचे हेल्थ अपडेट दिले आहेत.

अमीषा पटेलच्या पोस्टमध्ये नेमकं काय?

"धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना Under Observation ठेवण्यात आले आहे. पुढील अपडेट्स मिळतील तशा देत राहू. कृपया त्यांच्या प्रकृतीबद्दल खोट्या अफवा पसरवू नका. सर्वांना विनंती आहे की, त्यांनी लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करावी. कुटुंबाच्या गोपनीयतेच्या अधिकाराचा आदर करावा."

टीम सनी देओल"

धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली समजताच संपूर्ण कुटुंब रुग्णालयात त्यांना पाहायला गेले. तसेच बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांनी देखील धर्मेंद्र यांची भेट घेतली आहे. धर्मेंद्र यांचे चाहते सध्या ते लवकर बरे व्हावे याची प्रार्थना करताना दिसत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीची चर्चा पाहायला मिळत आहे.

ameesha patel

आगामी चित्रपट

धर्मेंद्र यांचा 'इक्कीस'(Ikkis) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. नुकताच इक्कीसचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. जयदीप अहलावत, एकवली खन्ना, सिकंदर खेर असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे महापालिकेची आरक्षण सोडत आज निघणार

Suraj Chavan Wedding: कोण आहे सूरज चव्हाणची होणारी बायको? जाणून घ्या तिच्याविषयी

Ginger Juice In Winter : हिवाळ्यात आल्याचा ज्यूस प्यायल्याने शरिरात होतील हे चमत्कारिक बदल

Dr. Shrikant Shinde : अंबरनाथमध्ये महायुतीत बिनसलं? श्रीकांत शिंदेंचं भाजपाला रोखठोक आवाहन

Holding urine habit: सतत लघवी रोखून धरण्याची सवय आरोग्यासाठी घातक; तुम्ही विचारही केला नसेल असे होतील आजार

SCROLL FOR NEXT