Dharmendra Heartbroken With Esha And Bharat Divorce News Instagram @aapkadharam
मनोरंजन बातम्या

Dharmendra News: ईशा-भरतच्या घटस्फोटामुळे धर्मेंद्र यांना बसला मोठा धक्का; दोघांनाही दिला खास सल्ला

Esha And Bharat Divorce News: ईशा देओलने नुकतंच पती भरत तख्तानीपासून विभक्त झाल्याची घोषणा केली. तिच्या या घोषणेमुळे वडील धर्मेंद्र यांनाही धक्का बसला आहे.

Chetan Bodke

Dharmendra Heartbroken With Esha And Bharat Divorce News

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलने नुकतीच पती भरत तख्तानीपासून विभक्त झाल्याची घोषणा केली. तिच्या या घोषणेमुळे चाहत्यांसोबतच वडील धर्मेंद्र यांनाही धक्का बसला आहे. धर्मेंद्र यांनी आपल्या लेकीला घटस्फोटाच्या निर्णयाचा विचार कर, असं सुद्धा तिला सांगितले आहे. (Bollywood)

'बॉलिवूड लाईफ'च्या रिपोर्टनुसार, देओल कुटुंबीयांच्या जवळच्या एका व्यक्तीने दिलेल्या माहिती दिल्यानुसार, धर्मेंद्र यांना मुलगी ईशाने घटस्फोट घेऊ नये, असं वाटत होतं. त्यांनी ईशाला घटस्फोटाच्या निर्णयावर पुन:र्विचार करण्यास सांगितले होते. आयुष्यामध्ये घडत असलेल्या गोष्टींमुळे ईशाने थेट घटस्फोटाचाच निर्णय घेतला. धर्मेंद्र यांनी ईशा आणि भरतला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. कोणत्या आई- वडीलांना आपल्या लाडक्या मुलीचे घर उद्ध्वस्त झालेले आवडेल का? असा प्रश्न त्यांनी विचारला. (Bollywood Actress)

धर्मेंद्र लेक ईशाच्या घटस्फोटाच्या निर्णयाविरोधात नाही. पण तरीही हा आयुष्यातला मोठा निर्णय घेण्याआधी तुम्ही दोघांनीही विचार करा. ईशा आणि भरत हे दोघेही धर्मेंद्र यांच्या निर्णयाचा खूप सन्मान करतात, विचार करतात. देओल परिवाराने कायमच भरतला जावया सारखे नाही तर आपल्या लेका प्रमाणेच त्याला वागणुक दिल्याचीही माहिती देओल कुटुंबीयांच्या जवळच्या एका व्यक्तीने दिली. दोघेही कायमच आनंदीत रहावे असं धर्मेंद्र यांना वाटते. ईशा व भरत यांनी “आम्ही दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे” असं म्हणत ईशा आणि भरतने विभक्त होण्याची घोषणा केली होती. (Dharmendra)

'झूम एंटरटेनमेंट'ने दिलेल्या माहितीनुसार, ईशा व भरत यांनी खूप आधीच वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता, पण ते त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत होते. ईशा व भरत या दोघांनीही आधीच आपला निर्णय मार्ग ठरवला होता. हेमा मालिनी मुलीच्या कोणत्याच निर्णयात हस्तक्षेप करणार नाहीत, असं त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितलं आहे. त्यासोबतच त्या घटस्फोटाच्या निर्णयामध्ये मुलगी ईशाच्या बाजूने आहे. (Bollywood News)

ईशा आणि भरतला ६ वर्षांची राध्या आणि ४ वर्षांची मिरा अशा दोन मुली आहेत. ईशा आणि भरतने २९ जून २०१२ रोजी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलं होतं. दोघांचं लग्न इस्कॉन मंदिरात पार पडलं होतं. लग्नाच्या पाच वर्षानंतर त्यांनी पहिल्या मुलीला जन्म दिला. आणि नंतर २०१९ मध्ये दुसऱ्या मुलीला जन्म दिला. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chaitanyanand Swami: विद्यार्थिनींना धमकावून चैतन्यानंद सरस्वतीकडे पाठवायच्या, इन्स्टिट्यूटच्या ३ महिला अधिकाऱ्यांना अटक

Shocking : मोबाईलवर गेम खेळू नको, बहीण ओरडली; रागाच्या भरात भावाचा टोकाचा निर्णय

हैदराबाद विरुद्ध ब्रिटिश गॅझेटियरवरुन वाद?मुंडेंच्या टीकेला जरांगेंचं वादग्रस्त उत्तर

Scholarship: सरकारनं घेतला विद्यार्थ्यांच्या भल्याचा निर्णय; नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळेल दुप्पट शिष्यवृत्ती

दसरा मेळाव्यात आरक्षणाचं शस्त्रं पूजन, हैदराबाद गॅझेटियरला मुंडेंचा विरोध?

SCROLL FOR NEXT